पान:वेरुळ.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४
 प्रेक्षणीय स्थळे पहावयास जाणार तर फोटोग्राफीचें सामान बरोबर पाहिजे, डार्क रूम पाहिजे, डेव्हलपिंगचे सामानाची पेटी पाहिजे. काय नको ? आम्ही खाशीं माणसें १० व नोकरचाकर सर्व मिळून सुमारें प्रत्यक्ष आमची २० माणसें.

 रा. सा. बाजीराव गुत्तीकर येणार. चि. श्री दादामहाराज, त्यांच्या पत्नी सौ. वहिनी महाराज, चि. श्री बाळामहाराजांची मुलगी चि. इंदु, हीं अर्थात् सर्व खाशांपैकींच. किर्लोस्कर यांची मोटार झाली तरी त्यांत सर्व त्यांचींच माणसें. खुद्द रा. लक्ष्मणराव किर्लोस्कर, सौ. राधाबाई, त्यांचा मुलगा व मुलगी, रा. शंकरराव किर्लोस्कर, त्यांचा आचारी आणि अंतोबा फळणीकर व दामू मोटार ड्रायव्हर मिळून त्यांच्या मोटारींत भरपूर माणसे होती. त्यांत आमच्यापैकी एखादें मूल तरी बसेल असे जें वाटत होतें, तें त्यांच्यापैकीं- च कोणाला आमच्याकडे घेण्याचा प्रसंग येतो आहे की काय, अशी शंका वाटू लागली.

 श्री जगन्नाथमहाराज यांस तुम्ही येतां कां, ह्मणून विचारलें. त्यांनी 'होय' ह्मणून अर्थात् सांगितले. मोटारीचा सर्व एक हजार मैलांचा प्रवास. जितक्या जास्त मोटारी तितकी सोय जास्त असें आह्मास वाटलें.

 आमच्या दोन मोटारी नव्या आल्या तरी त्यांत सामानसुमान आणि माणसें फक्त खाशी बसणार. चाकर माणसांस निराळी कांहींतरी सोय पाहिजेच होती.

 शिवाय अजंठा, वेरूळ म्टहले कीं जो तो ' येऊं कां' ह्मणून गरीब तोंड करून विनवूं लागला. कोणास नको आणि कोणास होय ह्मणावें याचीच पंचाइत पडूं लागली. चि. श्री. बाळामहाराज, पंढरीनाथ आमच्या बरोबरच येणार. रा. पंडितराव, चिटणीस दर्शने, व्ही. के. कुलकर्णी आमच्या बरोबरच येणार. तरी चारदोन लोकांना नाराज करावे लागले. कारण मोटारीत जागाच नाहीं. त्यांना 'तुझी परस्पर आगगाडीनें येऊन आम्हाला वेरूळ, अजंठा येथे मिळा.' असे सांगितले. पण त्यांना राग आला असेंच वाटतें. तथापि त्यास आमचा इलाजच नव्हता. लांबच्या प्रवासाला मोटारी सामानानें आणि माणसांनी जास्त भरणें अनिष्ट होतें.

 दोन नव्या मोटारीत भागण्यासारखे नव्हतेंच. तेव्हां ओव्हरलंड आणि क्यूबिट ओव्हरहॉल करण्याकरितां, कांहीं सामान या दोन नव्या मोटारीबरोबर आणून, त्या