________________
वेदकालनिर्णय. कुत्रा यमलोकाचे दरवाजे राखण्यासाठी ठेविला आहे व ऋग्वेदांत यमाचा चार डोळ्यांचा कुत्रा त्याच्या राज्याचा मार्ग राखीत आहे. या गोष्टींच्या आश्चर्यकारक सादृश्यावरून त्यांचे मूळ एक असले पाहिजे हे उघड दिसते. परंतु त्यांचा आजपर्यंत कोणी समाधानकारक अर्थ दिलेला नाही. पण ओरायनमध्ये वसंतसंपात होता असें जर आपणं समजलों, तर वर सांगितलेले कुत्रे स्वर्ग व यमलोक यांच्या सीमेवर येतील व मग सर्व वरील गोष्टी आकाशांत स्पष्ट दिसतील. आपल्या ग्रंथांमध्ये मृतमनुष्याच्या आत्म्याला यमलो. काला जातांना एक नदी 1 उलटावी लागते असें वर्णन आहे, व ग्रीक लोकांमध्येही अशी कल्पना आहे. मृगशीर्षामध्ये वसंतसंपात धरिल्यास ही नदी मणजे आकाशगंगा हे सहज समजेल. यमलोकाला जाण्यासाठी या नदीजवळ ग्रीकलोकांनी अर्गास ह्मणजे नौका ठेवली आहे. वेदांमध्येही दिव्यनावेतून उत्तम लोकाला जाण्याचे वर्णन आहे. तेथे दैवीम् नावम् असे शब्द आहेत. अथर्व वेदांतही (६.८०. ३) दिव्यस्य शुनः असे शब्द आहेत. या दोहोंची सांगड घातली असतां दिव्य किंवा दैवी याचा अर्थ आकाशांतील ( दिवसंबंधी) असा घेतला पाहिजे. महिम्नस्तोत्रादि अर्वाचीन संस्कृत ग्रंथांमध्ये रुद्रा, दिव्य शरीर * ऋ. १०.१४.१० वैतरणी; मृताच्या नावाने एक गाय द्यावी, हणजे त्याला या नदीपलीकडे जावयाचा नावेचा खर्च देतां येतो असें गरुडपुराणांत सांगितले आहे. मऋग्वेद १०-६३-१०