________________
वेदकालीनर्णय. ४६ " आतां हे तारकापुंज जर मूळचे आर्यांचेच आहेत, तर आर्यजातीच्या तिन्ही शाखांमध्ये या पुंजांविषयी काही सारख्या सारख्या गोष्टी असल्या पाहिजेत. वेदांमध्ये देवयान व पितृयान यांच्या विषयींच्या कल्पना अगदी सार्वत्रिक झाल्या होत्या असें म्हणण्यास हरकत नाही. या कल्पना बहुधा दिवस व रात्र अथवा उजेड व काळोख यांवरून बनल्या असाव्या. वेदामध्ये, पितृयान ह्मणजे आकाशाचा अगदी खालचा भाग ह्मणजे ज्यांत अपार समुद्र आहेत व जेथे वैवस्वताचे ह्मणजे यमाचे राज्य आहे असा प्रदेश असें वर्णन* आहे. त्याचप्रमाणे देवयानामध्ये इन्द्राचे राज्य आहे. याप्रमाणे एकंदर आकाशगोलाचे एक प्रकाशित व ज्ञात आणि दुसरा जलमय व अंधकारयुक्त असे दोन भाग केलेले आहेत. आतां या देवयान व पितृयानरूपी गोलार्धाना एके ठिकाणी जोडणे आहे. हे काम वसंत व शारदसंपातांनी केलें; व ही संपातस्थाने स्वर्गाची उर्फ देवलोकाची उर्फ देवयानाची. द्वारे झाली. मग ती राखण्याकरितां कुत्रही मिळाले. ही स्वर्गद्वाराची कल्पना वेदांपासून आलेली आहे. ... पारशी लोकांमध्ये ही गोष्ट जास्त पूर्णपणे राहिली आहे. त्यांच्यांत संपात झणजे नुसता दरवाजा नाही, तर तो देवलोक व यमलोक यांच्या मधला पूल आहे. त्याला चिन्वत् सेतु ह्मणतात. व तो राखणारे कुत्रे मृतमनुष्यांच्या आत्म्यांना त्यावरून जावयास मदत करितात. ग्रीक कथांमध्ये कर्बेरास नांवाचा तीन डोक्यांचा
- ऋग्वेद ९-११३-८.