Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. त्पत्तीसंबंधाने बराच मतभेद आहे. परंतु त्या सर्व मतांच्या मुळाशी मार्गशीर्षी पौर्णिमेला पूर्वी एकदां वर्षारंभ होत असे व त्या पौर्णिमेच्या नावावरून मृगशीर्षाला आग्रहायणी हे नाव पडले ही ल्पना साधारण आहे. जर ही कल्पना दूर केली तर या दहिदासंबंधाने सर्व अडचण नाहीशी होते. शिवाय ही कल्पना खरी मानावयास वेद किंवा पाणिनि यांमध्ये आधार नाही. पाणिनीचे एकंदर धोरण अग्रहायण हे नक्षत्राचें नांव धरून त्यावरून आग्रहायणी हे पूर्णमासाचें नांव व त्यावरून आग्रहायणिक हे महिन्याचें नांव साधण्याचे आहे. नक्षत्रवाचक अग्रहायण शब्द आतां नाहीसा झाला आहे व अमरसिंहाने आग्रहायणी असाच नक्षत्रवाचक शब्द दिला आहे. परंतु या जुन्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास करण्यांत अमरसिंह एकटाच वांटेकरी आहे असे नाही. मार्गशीर्षी पौर्णिमा ही संवत्सराची प्रथम रात्र होती, या कल्पनेवरून पुढील बाङ्मयामध्ये दुसऱ्याही पुष्कळ चुका उत्पन्न झाल्या आहेत. आतां मार्गशीर्षी पौर्णिमेला वर्षारंभ होत असे असें धरल्यास काय काय निष्पन्न होतें तें पाहूं. असे मानण्यास प्रत्यक्ष आधार " मासानां मार्गशीर्षोऽस्मि ऋतूनां कुसुमाकरः " या *गीतावचनाखेरीज दुसरा कोणताही नाही. आनंदगिरीने या गीतावचनावरील शांकरभाष्याच्या टीकेमध्ये मार्गशीर्ष महिना समृद्धीचा असतो झणन त्याचे विभूतिमत्व वर्णिले आहे असें मटले आहे. परंतु

  • भ. गी. १०-३५.