Jump to content

पान:वेदकालनिर्णय.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. आग्रहायणी याचा अर्थ वर्षारंभ करणारे असा आहे. परंतु त्या नक्षत्राला हे नांव मिळाले कसे ? हा प्रश्न आहे. कोशकारांनी व्युत्पत्ति देतांना मार्गशीर्षी पौर्णिमा ही वर्षाची प्रथम रात्र असल्यामुळे तिला आग्रहायणी असे म्हणतात व आग्रहायणीमा पूर्णचंद्र मार्गशीर्षांत होतो म्हणून त्या महिन्याला आग्रहायणिक असें नांव मिळाले असे सांगितले आहे. हे ठीक आहे. परंतु ते आणखी असे म्हणतात की, अमरकोशांत सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्षाचेंच आग्रहायणी असें नांव आहे, कारण त्या नक्षत्री चंद्र असतांना पूर्वी वर्षारंभ होत असे. परंतु हे म्हणणे बरोबर दिसत नाही. कारण नक्षत्रावरून पूर्णमासाला नांव द्यावयाचे ही नेहमीची रीत आहे. म्हणून आग्रहायणी संबंधाने मात्र पूर्णमासावरून नक्षत्राला नांव मिळते असे म्हणणे बरोबर नाही. पाणिनीच्या ८ मताप्रमाणेही असल्या उलट्या पद्धतीला काही आधार नाही. पाणिनीने आग्रहायणीपासून आग्रहायणिक असे महिन्याचे नांव दिले आहे. त्यावरून आग्रहायणी याचा अर्थ त्याच्या मते मृगशीर्षनक्षत्र असा नसून मार्गशीर्षी पौर्णिमा असा असावा असे दिसते. कारण महिन्यांची नांवें पूर्णमासावरून. साधावी असे त्याचे मत आहे. आतां आग्रहायणी हा पूर्णमासवाचक शब्द पाणिनीने चैत्री वगैरे शब्दाप्रमाणे साधिला आहे की काय हे बरोबर समजत नाही. परंतु कार्तिकी वगैरे शब्दांच्या सादृश्यावरून पहातां, त्याने अग्रहायण शब्दापासून आग्रहायणी शब्द साधिला असून, अग्रहायण है मृगशीर्षाचे मूळचें नांव असावे, असे दिसते. या शब्दाच्या ०७