हे लेख व्यक्तिचित्रे लिहिली. त्यातून दीक्षितांच्या समग्र जीवनाचे तपशील सूत्रबद्धपणे येतात व त्याचे आत्मचरित्र अप्रत्यक्षपणे स्पष्ट होते. पण इथे हे एका व्यक्तीचे जीवन राहात नाही. दीक्षित या साऱ्या कथेचे सूत्रपात्र होय. त्यांच्या आठवणीतून इथल्या व्यक्ती, घटना, प्रसंग जिवंत होतात व त्यातून गतकाल साकारतो. तो अस्तंगत विरलेली एक घरंदाज लोकसंस्कृती उभी करतो.
नामदारनामा' पुस्तकांच्या सावलीत वाढलेले दीक्षितांचे बालपण स्पष्ट करतो. नंतर या कथेचे एक भरगच्च पात्र असलेल्या आजोबांचे खानदानी चरित्र उलगडत जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मणांचे वाडे हे तत्कालीन लोकसंस्कृतीचे ऐवज! त्यात सर्वसमावेशकता होती. माणुसकीचा पाझर होता. मोठेपणा होता पण कुणाचा अनादर नाही व्हायचा. तिथं घासातला घास देण्याचे औदार्य हे नामदाराचे वैभव होते. मग मित्राष्टक सुरू होते ते 'ऐने अकबरी'तून ‘नारायंड्रावांची बखर' हा 'नामदारनामा' चा आत्मा. नारायणराव हे काका. त्यांच्या जीवनाचा सारीपाट इथे मांडलेला आढळतो. माणसाचे घरंदाजी जगणे, नादिष्ट-छंदिष्ट जगणे हे ठेवणीतले. सिनेमा, तमाशा, वशीकरण, तारुण्यसुलभ हिकमती, कुरापतीतून जे लोकजीवन इथे उभे राहते ते दीक्षितांच्या विस्तारातून. वैभव व विनोदाचे नवे विभ्रम निर्माण करणा-या शैलीच्या पाऊलखुणातून, मिश्किलपणातूनही मतलबाचे, मुद्याचे सांगण्याचे दीक्षितांचे कसब पूर्वसुरीच्या विनोदी शैलीकारांना मागे टाकणारे, हरवणारे खचितच असते. हे असते या 'नामदारनामा'चे निराळेपण नि नामांकितपणही! गोजा मावशी, गुंडो अप्पाजी, गंपू इथे भेटतात. हसवतात, अंतर्मुख करतात. वाचताना तुम्हास थबकायला भाग पाडतात. नामदारनामा' म्हणून गमतीदार आहे तसा घन गंभीरपण!
‘नामदारनामा'तील कथा, तिच्यातील व्यक्ती नि प्रसंगात कल्पना व वास्तवाची सरमिसळ असल्याचा कबुलीजबाब हा लेखकाच्या बुजरेपणातून आला असला तरी तो एक लेखकीय बनावच म्हणावा लागेल. ही सरळ सरळ लेखकाची बखर आहे. ती त्यांनी व्यक्तिचित्रातून उलगडली आहे. ही आत्मकथा लेखनाची नवी शैली, नवा प्रयोग, नवे तंत्र म्हणून नोंद घ्यावी अशी आहे. या ‘नामदारनामा'ची अनेक वैशिष्ट्ये वाचताना लक्षात येतात. ही एका विस्तृतकाळाची तपशीलवार आशयघन लोकबखर आहे. हिची मांडणी मुलखावेगळी आहे. फर्मास व्यक्तिचित्रे रंगवण्याचा लेखकाचा बाज त्याच्या लेखनशैलीचा घरंदाजपणा घेऊन येतो, इथे नातेसंबंधाची उलघाल आहे. नमुनेदार माणसांचे मोहळ इथे भेटते. इथली माणसे वाचकाला गळामिठी मारतात. ती हृदयस्थ होतात. ‘नामदारनामा'ची भाषा अस्सल ग्रामजीवनाचे