पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पूर्वसंचित स्पष्ट करते. कलेची अष्टदर्शने घडविण्याचे सामर्थ्य घेऊन आलेलं हे आत्मकथन गर्भश्रीमंतीत दडलेले माणूसपण समजावते. एका अस्तंगत झालेल्या सरंजामी संस्कृतीचे उत्खनन करणारे हे लेखन माणसाने हरवलेल्या माणूसपणाच्या खुणा परत हाती देते. हे असतं या ‘नामदारनामा'चे देणे. कमलाकर दीक्षितांनी अस्सल ग्रामीण म्हणी, वाक्प्रचार, संवाद इ. तून हरवलेल्या लोक जीवनास ज्या उमेदीने जिवंत केले आहे ते वाचणे म्हणजे आपली अनुभव श्रीमंती वाढवणे. किस्से- कहाणीतून, व्यक्तीवैचित्र्यातून आपली जीवन कहाणी एका व्यापक लोकसंस्कृतीच्या कॅनव्हासवर चित्रित करण्याचा हा प्रयोग मराठी आत्मकथेस पुढे नेणारा ठरेल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. हा ऐवज मात्र ज्याचा त्याने वाचून जोखणेच उत्तम. ज्यांना कुणाला आपण कालजयी (क्लासिक) वाचायलाच पाहिजे असे वाटते त्यांना 'नामदारनामा हा दीक्षितांनी दिलेला नजराणा पाहायला हरकत नाही.


• नामदारनामा (व्यक्तीचित्र संग्रह)

 लेखक - प्रा. कमलाकर दिक्षीत
 प्रकाशक - आनंद अंतरकर, पुणे.

 प्रकाशन वर्ष - २00८

♦♦

वेचलेली फुले/१३५