पान:विश्व वनवासींचे.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्राचार्य डॉ.भास्कर गिरधारी यांची ओळख सध्या पुणे येथे वास्तव्य आहे. विविध महाविद्यालयात मराठीचे प्रदीर्घकाळ अध्यापन केले. प्राचार्य म्हणून २२ वर्षे सेवापूर्ती. बी.ए.एम.ए. परीक्षात विद्यापीठात प्रथम श्रेणीत सर्व द्वितीय क्रमांक प्राप्त. शासनाची दक्षिणा फेलोशिप मिळाली. पुढे “महाभारतावर आधारित मराठी ललित साहित्य' या विषयावर पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादन केली. विद्यार्थी दशेत अनेक नामवंतांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. ते पीएच.डी.चे मार्गदर्शक होते. त्यांचे २४ विद्यार्थी पीएच.डी. व १४ विद्यार्थी एम.फिल. झाले आहेत. ____ महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे, आणि शासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांत त्यांनी विविध पदांवरून जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांनी आपल्या लेखनात सातत्य ठेवले असून १२ ग्रंथ, ५ संपादने प्रकाशित आहेत. त्यांनी आजवर २५ पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. अनेक विषयांवरील एक अभ्यासू, उत्तम वक्ते म्हणून महाराष्ट्राला ते सुपरिचित आहेत. आतापर्यंत २१ महनीय पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. त्यांच्या वाचन, लेखन, समाजसेवा, व्याख्याने ह्या आवडीच्या कार्यक्षेत्रात ते नेहमीच सक्रीय आहेत. संपर्क पत्ता :१) जे १२०२ आसावरी, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे ४११०६८ २) 'ए'विंग, ४०१, शुक्रतारा संकुल, सिंहगड पथ, पुणे - ४११०३०. चलभाष : ९८२३०१२३०१ E-mail : bvgirdhari@gmail.com Web: www.bvgirdhari.com