पान:विवेकानंद.pdf/279

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
थिऑसफीसंबंधी कांहीं स्फुट विचार.


 चालू साली थिऑसफीचे अनुचर आनंदोत्सवांत निमग्न झाले आहेत असे दिसतें. गेल्या वीसपंचवीस वर्षांत त्यांनी जी काय कर्तबगारी केली तिच्या- संबंधी वर्णनात्मक असे अनेक लेख लिहिलेले अनेक वर्तमानपत्रांचे अंक आज आम्हांपुढे आहेत.
 हिंदुलोक उदारमतवादी नाहीत असे म्हणायला आतां तरी कोणी पुढे येईल असे वाटत नाहीं. फार काय सांगावें, मतौदार्य दाखविण्याच्या भरांत कित्येक वेळां त्यांनी आपली फसगतही करून घेतली आहे. अशा स्थितीत ते जुन्याचे अभिमानी आहेत असे म्हणण्याचें धाडस कोण करील ? अमेरि- कन ब्रह्मविद्येच्या वृक्षावर बांधलेल्या या कलमाचा जयजयकार करण्यास कितीतरी तरुण हिंदु अहमहमिकेने पुढे येत आहेत ! या अमेरिकन ब्रह्म- विद्येचीं विशेष महत्त्वाचीं अंगें म्हटली तर गडबड आणि धडपड; आणि एखाद्या ठिकाणीं डाळ शिजत नाहींसें वाटले तर महात्म्यांच्या बंदुकांचा गोळीबार.
 सर्व विश्वाचें अस्सल ईश्वरीज्ञान आपणांपाशी आहे असें थिऑसफिस्ट लोक निक्षून सांगत आहेत. फारच आनंदाची गोष्ट. वाटेल तें करून तें ज्ञान गुप्त ठेवावयाचें असा त्यांचा संकल्प आहे, हे तर आमच्या आनंदांत आणखी भर पाडण्यास साधन झाले आहे. या ज्ञानगंगेचा ओघ जर आम्हां दुर्बळ पामरां- वर- आणि त्यांतल्या त्यांत हिंदूंवर एकदम कोसळला तर मात्र आमची धडगत दिसत नाहीं. थिऑसफी या शब्दाचा सध्याचा अर्थ म्हटला तर मिसेस बेझंट हाच. मॅडम ब्लॅव्हॅट्स्की आणि ऑल्कॉट यांची ब्रम्हविद्या आतां जरा कोपऱ्यांत जाऊन बसली आहे आणि बेझंटबाईंची विद्या पुढे आली आहे. बेझंटबाईचे उद्देश स्तुत्य आहेत आणि त्यांचा उत्साह व चिकाटी हीं वाखाण- ण्यासारखी आहेत हें कोणीही कबूल करील.
 थिऑसफीला ज्याप्रमाणें भगत पुष्कळ मिळाले आहेत, त्याप्रमाणेच तिच्यावर टीकेचा भडिमार करणारेही पुष्कळ आहेत. खुद्द आमच्याविषयीं म्हणाल तर आम्हांला थिऑसफीचें कार्य सर्वथा चांगलेच आहे असे वाटतें. आमच्या दृष्टीनें त्यांत दूषणास्पद असें कांहींच नाहीं. थिऑसफीच्या ज्या