पान:विवेकानंद.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२१६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


तत्त्वांत आणि प्रत्यक्ष व्यवहारांत पुष्कळ वेळां विरोध दिसतो; पण तो विरोध नसून विरोधाभास असतो. ज्याला कसल्याच प्रकारच्या प्रतिफलाची अपेक्षा नाहीं असा मनुष्य नेहमीं फसला जातो आणि अनेक जण त्याला अनेक प्रकारे त्रास देतात असे आपण पाहतो. मग त्याला यशस्वी कसें ह्मणतां येईल ? केवळ स्थूलदृष्टीने पाहिले तर हे यशाचे लक्षण नव्हे असे वाटते. येशु ख्रिस्ताने साच्या जन्मभर परोपकारावांचून कांहीं केलें नसतांही त्याला शेवटीं सुळाची प्राप्ति झाली. होय, या गोष्टी ख-या आहेत; पण त्याच्या अलिप्तवृत्तीने केवढ्या मोठ्या विजयाचा पाया घातला याचा विचार करा. लक्षावधि-कोट्यवधिजीवांना त्याने मुक्तीचा मार्ग दाखविला हे यश लहान ह्मणतां येईल काय ?
 कोणत्याही कर्माबद्दल उलट कांहीतरी मिळावे अशी आशा बाळगू नका. तुह्मांला कांहीं द्यावयाचे असेल ते देऊन मोकळे व्हा. ते तुमचे तुह्मांस अवश्य परत मिळेल; पण त्याबद्दल आज कांहीं विचार करू नका. तुमचे दान परत येईल तेव्हां ते एकटेंच न येतां आणखी बहुतांना आपल्याबरोबर घेऊन येईल; पण त्यावर आज लक्ष्य ठेवून बसू नका. जें कांहीं करणे असेल तें आज करून मोकळे व्हावयाचे इतकाच विचार त्या वेळी जागृत असावा. एक गोष्ट आपण पक्की लक्ष्यांत बाळगली पाहिजे ती ही की, आपला जन्म, घेण्याकरितां नसून देण्याकरितां आहे. प्रकृतीचा कायदा असा कडक आहे की, ती आपणांस द्यावयास भाग पाडील. मग खुषीने देण्यांतच शहाणपण नाहीं काय ? एक वेळ आपले सर्व आपणांस सोडून द्यावे लागेल. साच्या आयुष्यभर आपण मुठी मिटीत असतो. मूठ पक्की कशी मिटतां येईल हाच विचार सदैव आपल्या चित्तांत घोळत असतो; पण एखादी वेळ अशी येते, की आपल्या नरड्यावर पाय देऊन प्रकृति आपल्या मुठी दिल्या पाडते. त्यावेळी तुमची खुषी असो अगर नसो, तुह्मांस मूठ ढिली करावीच लागते. तुह्मी ‘नाहीं' ह्मटले, तर एखादी थप्पड अधिक मिळावयाची; यापलीकडे दुसरा कांहींच फायदा होत नाहीं. तुह्मी आपले सर्वस्व उराशी कितीही घट्ट धरून बसला, तरी ते टाकून देण्याची वेळ अवश्य येईल. ज्यावर अशी वेळ येत नाही असा एकही प्राणी जन्माला आलेला नाही. या कायद्याच्या विरुद्ध तुमची गडबड जितकी अधिक, तितके प्रकृतीचेही तडाके अधिक भयंकर आणि ह्मणून तुमचे कष्टही अधिक भयंकर! आपली देण्याची तयारीच कधी नसते. आपले हात सदोदित