पान:विवेकानंद.pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१५७


मला दिसत होते. त्या धोरणाने मी तेथे गेलों; आणि पाहतों तो तेथे पाणी मुळीच नव्हते ! मृगजलाच्या देखाव्याबद्दल ग्रंथांतरी अनेक गोष्टी मी वाचल्या होत्या; पण त्याबद्दल मला यथार्थ कल्पना मात्र नव्हती. त्या साच्या गोष्टी मला त्यावेळी एका झपाट्यासरशा आठवल्या, आणि मला जे हसू कोसळले ते सांगता येत नाही. मृगजलाबद्दल आगाऊ ज्ञान मला होते; पण ते पुस्तकी ज्ञान ! सबंध एक महिना मी अशी तळीं रोज पाहत असतांही, ते मृगजळ असेल अशी कल्पनाही कधी माझ्या चित्ताला शिवली नाहीं ! ही गोष्ट घडल्यानंतरही कित्येक दिवस त्या अरण्यांत मी फिरत होतों, आणि पुन्हा पुन्हा तोच देखावा मला कित्येक वेळां दिसला; पण मला अनुभवाने शहाणपण प्राप्त झाले होते, यामुळे तो देखावा दिसल्याबरोबर मृगजल' एवढाच शब्द माझ्या मनांत उभा राही. त्याचा खोटेपणा मला अनुभवाने पटल्याबरोबर, त्याच्यांतील फसविण्याचे सामर्थ्य नष्ट झालें ! त्याचप्रमाणें हें विश्वरूपीं मृगजलही एखादे दिवशी आपले खरे स्वरूप दाखवील. त्या दिवशी या विश्वरूपी मृगजलाची वाफ होऊन ती हवेत मिसळून जाईल. विश्व मुळांतच नव्हते असे तुह्मी ह्मणं लागाल ! यालाच ब्रह्मानुभव ह्मणतात. तत्त्वज्ञान हे केवळ बोलण्याकरितां नाहीं, अथवा तो चेष्टेचाही विषय नाही. त्यांतील प्रत्येक अक्षराचा अनुभव निःसंशय येईल; त्यावेळीं हैं शरीर वितळून जाईल, ही पृथ्वी आणि इतर साच्या वस्तूही नाहीशा होतील. मी शरीरधारी आहे, आणि मला मन आहे, या कल्पनाही कांहीं काळ नष्ट होतील; अथवा तुमचे कर्म संपुष्टांत आले असले, तर या कल्पना सर्वथा नष्ट होतील; आणि त्या पुन्हा केव्हाही परत येणार नाहींत. कर्मभोग अंशतः तरी शिल्लक असेल, तर हे शरीर कर्मक्षयापर्यंत चालू राहील. मडकें तयार करावयाचे असले, ह्मणजे मातीचा गोळा एका चक्रावर ठेवून, कुंभार ते चक्र गरगर फिरवितो. मडकें तयार झाल्यावरही पूर्वी दिलेला वेग शिल्लक असेपर्यंत चक्र फिरतच असते. त्याचप्रमाणे विश्वाचे अस्तित्व केवळ आभासरूप आहे, आणि देहही या आभासांपैकीच आहे. असा अनुभव आला तरी, ज्या पूर्वकर्मामुळे हा देह उत्पन्न झाला आहे, त्यांचा क्षय होईपर्यंत तो राहीलच. असा मनुष्य अनुभवाच्या स्थितीतून परत आला, ह्मणजे त्याला जग पुन्हा स्त्रीपुरुष, जनावरे, झाडेझुडपे इत्यादिकांनी गजबजलें आहे असे दिसू लागेल: