पान:विधवा दुःख निवेदन.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

CASI ईश्वर अनाथाचा वाली आहे. तो तुह्मांस कधी अतंर देणार नाही. द्रौपदीचा टाहो कानी पडतांच तो प्रभु एकदम धांवलाअहिल्या शिला होऊन पडली असतां पादस्पर्शाने तिला उत्तम गति दिली; सावित्रीचे सौभाग्य नष्ट झालें असतांही तिला तिचा पति पुन्हां परत दला; तो दीनदयाळ प्रभु आमच्या संकटांची कहाणी ऐकून धावून येणार नाही काय येईल; खचित येईल. मागील जन्मी केल्या कर्माची फळे आमी ह्या जन्मी भोगीत आहोत; ह्मणून ह्या जन्मी तरी सत्कर्मे करून व पुण्यमार्गाने चालून पुढील साधन करून ठेवूया; ह्मणजे तो जगच्चालक परमात्मा आह्मांस उत्तम गति देईल ह्यांत शंका नाही. इतकें सांगून तुमचा निरोप घेऊन मी हा लेख पुरा करितें.. समाप्त.