पान:विधवाविवाह.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय ३ रा. पराशराचे विवाहविषयक वचन मनुस्मृतीस विरुद्ध नाही. आमच्या बहुतेक प्रतिपक्ष्यांच्या म्हणण्याचे पर्यवसान असे आहे की, विधवांचा विवाह मनुस्मृतीस विरुद्ध आहे. यावरून त्यांचा अभिप्राय असा दिसतो की, पराशर वचन कलियुगांत विधवाविवाहाचे विधायक आहे, तरी तें मनस्मृतीस विरुद्ध आहे यास्तव ते पुढे लिहिलेल्या बृहस्पति वचना वरून त्याज्य आहे. वेदार्थोपनिबन्धृत्वात् प्राधान्यं हि मनोः स्मृतं । मन्वर्थविपरतिा या सा स्मृति ने प्रशस्सते*॥ "आपल्या संहितेत मनने वेदार्थाचाच संग्रह केला आहे यास्तव त्याची संहिता मुख्य प्रमाण होय. आणि त्याच्या संहितेशी विरुद्ध ज्या स्मृत्ति त्या प्रमाणभूत नव्हेत." हे वरील म्हणणे सयुक्तिक दिसत नाही. बृहस्पातिम्हणतो मनुसंहिता मुख्यप्रमाण, आणि तिजशी विरुद्ध ज्या स्मात त्या अप्रमाण, परंतु ती संहिता मुख्य प्रमाण कोणत्या यगांत मानावी हा विशेष तो सांगत नाही. आणि त्याज प्रमाणेच महाज्ञानी जो पराशर तो स्पष्ट सांगतो की, मनुसंहिता ही केवळ सत्य युगाविषयों प्रमाण होय, अन्य युगाविषयी नव्हे. पराशराने हा विशेष सांगितला नसता

  • हे कन्कभट्टानें उतरून घेतले आहे. * ५ व्या पृष्ठावर पाहा.