पान:विधवाविवाह.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाषांतरकर्त्याने मलग्रंथाचा अर्थ व आभिप्राय कोठे सो. डले नाहीत. तरी एके ठिकाणी मूलग्रंथांत दिलेली उदाहरणे बंगाल प्रदेशांतील असल्यामुळे इकडच्या लोकांस समजण्या. सारखी नव्हती, त्याकारतां या प्रदेशांतील विशेष माहितीची काही उदाहरणे ज्यास्ती घातली आहेत, मलग्रंथकर्त्याने तो बंगालीतून इंग्रेजीत केला तेव्हां बंगालीतील कितीएक अध्याय इंग्रेजी वाचणारास अनुपयुतसे वाटून ते त्याने समूळ गाळले. भाषांतरकासही आपल्या वाचणारांविषयी तसेच वाटून त्यानेही या ग्रंथांत ते गाळले आहेत. कधी कधी एकच स्मति अनेकवेळा आली आहे तशा. ठिकाणी पहिल्या प्रसंगी मात्र तिचा अर्थ लिहून दुसऱ्याठिकाणी त्या पृष्ठावरील अर्थाचा हवाला टिपेमध्ये दिला आहे. मूलग्रंथांतील वचनें ज्या दुसऱ्या ग्रंथांतून घेतली आहेत ती तशी आहेत किंवा कसे हे पाहण्याकरतां, ज्या ग्रंथांचे हवाले ग्रंथकाने दिले आहेत त्यांतील कितीएकांचा भाषांतर कर्त्याने स्वतः तपास केला त्यावरून ते ग्रंथकाने लिहिल्याप्रमाणेच बरोबर आहेत असे खात्रीने समजले ही गोष्ट मोठी संतोषाची आहे. याच ग्रंथांतील विषयास काही अंशी लागून असलेल्या एकदोन गोष्टी एका सुज्ञ मित्राने मेहरबर्बानीने सुचविल्या