पान:विधवाविवाह.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. या ग्रंथांतील विषय हणजे विधवाविवाह हा जरी जुना आहे तरी याचा विचार करण्याची या ग्रंथांतली रीति अगदी नवी आहे; ह्मणजे या विषयाचा विचार केवळ शात्ररीतीने आजपर्यंत कोणी तादृश केला नाही. आणि या ग्रंथांत तर या विषयाचा विचार अथपासून इतिपर्यंत केवल शास्त्रप्रक्रियेस अनुसरूनच केला आहे. या ग्रंथाच्या लेखाच्या सरणीस पुनरुक्तीचा अथवा गरज नसतां उगीच विशेष स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा दोष कोणी वाचणारे कदाचित देतील; परंतु या विषयाच्या जातीवरू. नच यावर शास्त्रीयरीतीने विचार करणे आवश्यक पडले व त्यावरून त्यांतील पारिभाषिक शब्द व रीति ह्या घेणेही जरूर पडले. आणि आमच्या प्रस्तुतच्या सर्व साधारण वाचणान्यांस असा विषयच मुळी समजणे थोडेसें कठिण आणि तशांत परस्परांशी संबद्ध अशा प्रमाणपरगोष्टींच्या दीर्घ श्रेणीचे एकसारखें अनुसंधान ध्यानांत राहणे हे तर त्याहूनही कठिण आहे. या गोष्टींचा विचार करतां मूलग्रंथकर्ता व भाषांतर कर्ता यांस, पुनरुक्तीकडे किंचित दुर्लक्ष करूनही हा विषय जितका विशद करवला तितका करणे जरूर पडले.