पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५
प्रकरण ५ वें



प्र्करण ५ वें
विणकाम.


 शा रीतीने बीमवरील देोरे वया व फणी यांतून ओवून घेतल्यावर बीम मागावर ठेवण्यापूर्वी उभा केलेला माग बरोबर चालतो किंवा नाहीं हें पहावें.

 एक पावडी दाबावी व त्या पावडीच्या बाजूच्या पिकरला टोला मारावा; असें केल्याबरोबर शटल, असलेल्या पेटीतून निघून समोरील पेटीमध्यें न डगमगतां बिनचूक गेलें पाहिजे. याचप्रमाणें दुसरी पावडी दाबून त्या बाजूच्या पिकरला टोला मारल्याबरोबर तें शटल परत पूर्वजागीं आलें पाहिजे. असें होत नसेल तर शटल बॉक्स किंवा शट्ल्ररेस यामध्यें दोष आहे असें समजावे. शटल बॉक्समध्यें दोष असण्याची तीन ठिकाणें आहेत. १ पिकर फिरण्याकरतां घातलेली सळई,२ पिकर व ३ शटलबॉक्सच्या फळ्या.पिकरची सळई वांकडी असू नये व ती शटलबॉक्समध्यें अगदी सरळ बसलेली पाहिजे. पिकर सळईमध्ये सहज फिरलें पाहिजे. शटलबाक्समध्यें पिकर लटपटूं नये म्हणून पिकरचे खालचें टोक व तें टोंक फिरण्याकरितां केलेली खांच बरोबर आहे किंवा