पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२४

विणक-याचा मार्गदर्शक


फणी

 फणीचे दांते जवळ जवळ किंवा दूर दूर असण्यावर कापडाचा भरदारपणा किंवा विरळपणा अवलंबून असतो. विरळ कापड विणणें असल्यास दूर दूर दांते असलेली फणी उपयोगांत आणतात किंवा एकच फणी असल्यास मधील फटी सेोडून द्याव्या लागतात; व भरदार कापड विणण्याकडे जवळजवळ दांते असलेल्या फणीचा उपयोग करतात. निरनिराळ्या जातीच्या कापडाकरितां निरनिराळ्या फण्या तयार केलेल्या असतात, व कारखानदारांपाशीं त्या असणें सेोईचें असतें.

 या फणी 2४ पासून ७2 इंचापर्यंत लांब असतात, व एका इंचामध्यें १० पासून ६० पर्यंत दांते असतात. जितक्या फटी एका इंचांत त्याच्या दुपटिस त्या फणीचा नंबर किंवा कौंट असें म्हणतात. एका इंचांत २० फटी असल्या तर त्या फणीला ४० नंबरी फणी असें म्हणतात. हातमागाच्या फण्यांच्या कांटाकडील फटी मधल्या फटींपेक्षां जास्त जवळ जवळ असतात. गिरणींतील फण्या तशा नसतात, यामुळे गिरणीतील कापडाचे कांठ हातमागाच्या कापडाइतके भरदार व सुबक नसतात.

  कांठ कापडाच्या इतर अंगांपेक्षां जाड यावे म्हणून फणी भरतेवेळीं पहिल्या ५/६ घरांत जास्त दोरे घालतात. धोतरें व चादरी यास जास्त कांठ ठेवावे लागतात म्हणून फणीच्या प्रत्येक बाजूच्या १०/१५ घरांत सुद्धां चार चार दोरे घालतात.यास ती घरे डबलं भरणं असं म्हणतात.