पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२३

प्रकरण ४थे.

 दोन ब्राकेटमध्यें बीम आडवा टांगलिला असतो व त्या बीमजवळ दोन वया टांगलेल्या असतात. वयांतील डोळे उघडे राहून वयांच्या जाळ्या ताठ रहाव्या ह्मणून प्रत्येक वईच्या खालचे दोन्ही बाजूंस हूक लावून ती ताणून धरलेली असते. वयांच्या दोन बाजूंस एक एक मनुष्य बसलेला असतो. बीमकडे बसलेला मनुष्य यार्नबीमवरील दोरे थोडे उलगडून त्यांतील पहिला दोरा पहिल्या वईच्या डोळ्यांतून, दुसरा देोरा दुस-या वईंच्या पहिल्या डोळ्यांतून, तिसरा दोरा पहिल्या वईच्या दुस-या डोळ्यांतून याप्रमाणें पलीकडील माणसांस ओढून घेण्यांकरितां देतो व ते तो वईकडील माणूस् तोरेच्या लहनशा आकडीने ओढून घेतो, आणि पहिला व दुसरा हे दोरे वईच्यापुढें ठेविलेल्या फणीच्या पहिल्या फटीतून ओवून घेतो. अशा रीतीनें सर्व विषम नंबरचे दोरे पहिल्या वईच्या डोळ्यांतून निघतात, सम नंबरचे दोरे दुस-या वईच्या डोळ्यांतून निघतात आणि पहिला व दुसरा तिसरा व चवथा अशा जोड्या फणीच्या फटीतुन क्रमानें निघतात, हीं कामें करतांना सम विषम दोरे ओळखण्याच्या कामीं बीमच्या शेवटी घातलेल्या सांदीचा फार उपयेोग होतो. हे दोरे वया व फणी यांतून बिनचूक काढून घेतले पाहिजेत. त्यांत थोडीशी चूक झाली तर विणतना दो-यांची गुंतागुंत होऊन दोरे तुटतात व दोरे ओवून घेण्याचें काम पुन्हां करावें लागेल, म्हणून आरंभीच ओवण्याचें काम व्यवस्थेशीर व सावकाश करावें हें उत्तम.

 ह्या पुस्तकांत फक्त साधे विणकाम शिकविण्याचा उद्देश असल्यामुळे दोनच वया ओवण्याची कृती दिली आहे. ट्टीलच्या व इतर नक्षीच्या विणकामास जास्त वया लागतात, व फणीतून दोरे ओवून घेण्याची पद्धत निराळी असते, ती येथे देण्याचें प्रयोजन नाही.