पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२

विणक‌‌‌‌‌ऱ्याचा मार्गदर्शक

 मग बीम,वया व फणी ही तिन्ही मागावर योग्य ठिकाणी बसवावी. असे केल्याने मागाबरोबर असलेल्या वयांतून व फणीतून बीमवरील दोरे ओवून घेण्याचे श्रम वांचतात. परंतु ज्या ठिकाणी बीमिंगचे काम करण्याचे स्वतंत्र खाते असते किंवा ताणा आयताच तयार करून मिळतो अशा ठिकाणी तो तयार ताणा यार्नबीमवर घेतल्यानंतर यार्नबीमवरील दोरे मागाच्या वया व फणी यांतून ओवून घ्यावे लागतात.

 विणकामाकरितां प्रसिद्ध असलेल्या काही गांवामध्ये फक्त ताणा तयार करून देण्याचा धंदा करणारे लोक आहेत; कोष्टयाची मुले व घरांतील बायका वया आणि फणी ओवून देतात, व पांजणीचे वगैरे काम करितात. यामुळे कोष्टयांची मेहनत वांचते,व कामाचे विभाग करून एक एक भाग विविक्षित माणसांकडे सोप- विल्यामुळे प्रत्येक माणूस आपापल्या कामांत निष्णात होतो व तें लवकर करू शकतो. ही सृमविभागाची पद्धत विणकामाचा धंदा करणाऱ्यांस फार फायदेशीर आहे व ती लहान लहान कारखा- न्यांत सुद्धा अमलांत आणिली पाहिजे.

 ज्या मनुष्यांस फुरसतीचा वेळ काही फायद्याचा धंदा करून घालविणे असेल त्यांस वर सांगितलेली वया यासह फणी यार्नबीम मागावर नेउन ठेवण्याची पद्धत सोईस्कर होईल. परंतु हे पुस्तक कोष्टयाचा धंदा करू इच्छिणारांकरितां लिहिलेले असल्यामुळे यांत दोरे फण्यांतून व वयांतून काढून घेण्याची रीत

सविस्तर देणे जरूर आहे.