पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण 4 थें.
21

 

      ड्रमवरील दोरे यार्नबीमवर सारखे करून घेण्याकरितां ( पसरण्याकरितां ) एक याजना केलेली असते तिला बीमिंगफ्रेम म्हणतात.
बीमिंगफेम

.

 

      एका स्टँडमध्यें यार्नबीम, फिरता राहील असा आडवा बसविलेला असते. जें कापड काढावयाचें असेल त्याच्या बेताच्या दोन वयांतून ड्रमवरील सुताची टीकें पहिलींतून विषम व दुसरींतून सम अशा रीतीनें ओवून घेतात. नंतर एक विषम व एक सम अशी दोन दोन टोंकें फणीच्या प्रत्येक फटीतून क्रमानें ओवृन घेतात. सर्व टोकें बाहेर काढून घेतल्यावर तीं यार्नबीमच्या खांचीमधील पिन्सनां बांधतात. आतां यार्नबीम फिरावला म्हणजे उभे दोरे यार्नबीमवर व्यवस्थित रीतीनें गुंडाळले जातील.

 यार्नवीम सुमारें २४ पासून ८० इंचांपर्यंत लांब असतो, म्हणून आपल्यास जितक्या रुंदीचें कापड विणणें असेल तितक्याच बीमवर दोरे गुंडाळले जाण्याकरितां बीमच्या दोन्ही बाजूंस लांकडी ब्रेकेट ठेविलेले असतात. नियम असा कीं, ह्या ब्रेकेटांमधील अंतर फणीच्या उपयोगांत आणलेल्या घरांइतकेंच असलें पाहिजे. ब्रेकेट नीट बसविले म्हणजे उभे दोरे यार्नबीमच्या सर्व पृष्ठभागावर पसरणार नाहींत.

 बीम तयार झाल्यावर फणीच्या पुढील बाजूस सुमारें एक यार्ड देोरे तसेच शिलुक ठेवावेत, ते बीमवर गुंडाळून घेऊं नयेत. या यार्डभर दो-यांचा उपयोग ताणा क्लॉथरोलरला बांधण्याकडे करावयाचा असतो.