पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१८
विणक-याचा मार्गदर्शक.


ताणा.

 सुतानें भरलेले रीळ बॉबिन फ्रेममध्यें बसवावे. वरच्या रांगेमधील पहिल्या रिळाचें सूत थोडें उलगडून हेकफ्रेंममधील पहिल्या वईच्या उजवीकडील पहिल्या डोळ्यांतून बाहेर काढावें व तेंच सूत दुस-या वईच्या पहिल्या फटीतून ओवून ठेवावें. नंतर वरच्या रांगेतील दुस-या रिळाचें सूत पहिल्या वईच्या पहिल्या फटीतुन दुस-या वईच्या पहिल्या डोळ्यांतून ओवून ठेवावें. याप्रमाणें सर्व विषम दोरे पहिल्या वईच्या डोळ्यांतून व दुस-या वईच्या फटीतून अनुक्रमानें काढून घ्यावे; आणि समदोरे पहिल्या वईच्या फटीतुन व दुस-या वईच्या डोळ्यांतून उजवीकडून डावीकडे अनुक्रमानें काढावे. अशा रीतीनें तारेच्या वयामधून दोरे ओवून झाले ह्मणजे हेकफ्रेमपुढे एक फणी लाविलेली असते त्या फणीच्या प्रत्येक फटीतून एक सम एक विषम दोरा अशी जोडी क्रमानें ओवून घ्यावी. या सम व विषम दो-ंयाच्या विभागणीमध्यें चूक न होऊं देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. या कामांत हलगर्जीपणा झाल्यास ड्रमवर दोरे गुंडाळतांना एखादा चुकलेला दोरा ओळखून काढण्यास पंचाईत पडेल. फणी पुढेंच एक फिरतें आडवें रीळ असतें त्यावरून सर्व देरे घेतल्यावर त्यांची टीकें एके ठिकाणीं करून गांठ मारावी व ती गांठ ड्रमवर असलेल्या पहिल्या खिळ्यांस अडकवावी. आतां ड्रम फिरवू लागलें तर हा दो-यांचा समुदाय ड्रमवर गुंडाळला जाईल. ड्रम फिरण्यापूर्वी हेकफेमजवळ फणीच्या पुढे ज्या ठिकाणीं सम व विषम दोरे निरनिराळे दिसतात त्या