पान:विणकऱ्याचा मार्गदर्शक.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण ४ थे.
वार्पिग मशीन.

{{center|या यंत्रांत मुख्य तीन भाग असतात.
बॉबिन फ्रेम:-( रिळांची चौकट).
हेक फ्रेम:-(सांद पाडण्याची चौकट ).
ड्रम:-(रहाट).
 १. बॉबिन फ्रेम:- एक लांकडी चौकट करून तिचे तीन भाग केलेले असतात. त्या प्रत्येक भागांत एकाखालीं एक असे १० पासून १5 पर्यंत रीळ एकमेकांस न लागतां फिरतील अशा रीतीनें आडवे बसविलेले असतात. सूत भरण्याकरितां हे रीळ चौकटींतून काढतां येतील अशी व्यवस्था केलेली असते.
 २. हेक फ्रेम:-मागे सांगितलेल्या वईप्रमाणेंच तारेच्या दोन वया असतात व त्यांस मध्यभागीं डोळेही असतात. या डोळ्यांची संख्या बॉबिन फ्रेममधील रिळांइतकीच असते.
 ३. ड्रमः-विहीरीच्या रहाटाप्रमाणें हा एक रहाट असतो. त्यास एका बाजूस हॅंड्ल लाविलेलें असतें. हा रहाट आपल्या आंसाभोंवतीं फिरेल अशा रीतीनें चौकटींत आडवा बसविलेला असतो.

 ह्या तीन चौकटी चित्रांत दाखविलेल्या शिस्तीनें एकापुढें एक ठेविलेल्या असतात, व त्यांच्या सहाय्यानें ताण्याचे सुताची मांडणी करितात

.