पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९)

येणाऱ्या आरब लोकांत संकर झाला आहे असे प्रथम सिद्ध करावे व नंतर संकराने इतक्या उत्कृष्ट प्रजेची निर्मिती होत असल्यास संकराचा निषेध ते का करतात त्यांचा खुलासा करावा.
 चातुर्वर्ण्याच्या बुडाशी असलेल्या पहिल्या गृहीत गोष्टीप्रमाणेच दुसऱ्या व तिसऱ्या गोष्टीही इतिहासविरुद्ध आहेत असे दिसून आले. आता शास्त्र त्या बाबतीत काय म्हणते ते पाहू.
 एका घराण्यात किंवा जातीत अमुक एकच विशिष्ट गुण वाढेल, अन्य वाढणार नाही असे धरून त्या लोकांना अन्य कर्मे करण्याची बंदी करणे हे इतिहासाप्रमाणेच जीवनशास्त्रालाही नामंजूर आहे. जेनिंग्ज म्हणतो-
 Each individual has the possibility of many diverse careers.
 आरंभीच दिलेला वॅटसन् चा उतारा देऊन त्यावर टीका करताना तो म्हणतो की (भिन्न वंशासंबधी हे म्हणणं खरे नसले तरी)
 Such a population identical as to genesis in all its components would realize the situation postulated by Watson.'
 म्हणजे एकाच रक्ताची दहा मले घेतली तर त्यातल्या वाटेल त्याला वकील, डॉक्टर, व्यापारी, शास्ता, भिकारी किंवा चोरसुद्धा करण्याची करामत शक्य आहे.
 गाल्टनने असेच मत दिले आहे. 'Moreover as statistics have shown that the best qualities are largely co-related, the youths who become judges, bishops, statesmen and leaders of progrees could have furnished, formidable athletic teams in their times (Life and letters of Sir Fransis Galton by Karl Pearson Vol. ई PP. 273.)
 एकाच कुलांत धर्म, न्याय, राजकारण, शिल्प, वगैरे अनेक कार्याला लागणारे गुण निर्माण होणे शक्य असतांना त्या कुलावर तुम्ही अमुकच काम करा व इतर गुण वाया घालवा, फार तर आपत्प्रसंगीच वापरा, असा निर्बंध घालणे म्हणजे त्या गुणांचा जाणूनबुजून नाश करण्यासारखे आहे.