पान:विचार सौंदर्य.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

४७


मराठीची सध्यांची स्थिति आहे. कालांतरानेंच परिभाषा निश्चित होईल. तोपर्यंत केळकरांनी प्रयत्न करून ठरविलेल्या स्वरूपांचा विचार करूं या.

 "निरनिराळ्या वस्तूंमधील चमत्कारिक व अनपेक्षित असे संबंध जोडून दाखविणें असें म्हटलें असतां कोटि किंवा चतुरालाप यांची थोडक्यांत व्याख्या झाली. संबंधाचें अनपेक्षितत्त्व किंवा चमत्कारिकपणा हा कोटीचा आत्मा आहे. कोटीचा संबंध बुद्धिशक्तीशीं आहे व विनोदाचा संबंध हृदय- भावार्शी आहे. कोटि चांगल्या रीतीनें करतां येण्यास बुद्धि प्रगल्भ व संस्कृत असावी लागते. विनोद हा अशिक्षित मनुष्येंहि करूं शकतात. कोटीमध्यें नुसतें असंबद्धतादर्शनच नसतें, तर त्या असंबद्धतेचें स्वरूप नवीन कल्पना रचून व्यक्त करावें लागतें. विनोदास नवीन कल्पना अशी रचावयास लागत नाहीं तर त्या असंबद्ध स्थितीचेंच यथार्थ वर्णन दुसन्याचें लक्ष वेधेल अशा रीतीनें दिलें म्हणजे झालें. "

 कोटि व विनोद यांमधील भेदाचें वगैरे विवेचन केळकरांनीं जें उदाहरणें देऊन सुंदर रीतीनें केलें आहे, त्यांत भर घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे दिवाळींत विजेच्या दिव्यांनीं, आकाश-कंदिलांनीं वगैरे शृंगारलेल्या वाड्यांत आपल्या घरची पणती नेवून लावल्यासारखें व स्वतःमध्ये विनोदबुद्धि नाहीं हें दाखविण्यासारखे आहे. शिवाय विस्तारहि फार झालेला आहे. तेव्हां एक-दोन गोष्टींचाच उल्लेख करतों. एक क्षुल्लक गोष्ट अशी कीं, इंग्लिशमधील wit म्हणजे कोटि करण्याची शक्ति किंवा वैदग्ध्य, कोटि नव्हे; कोटीला witty remark किंवा witticism म्हणावें. (Witticism) हा शब्द कांहीं वेळां निंदाव्यंजक असतो हैं ध्यानांत ठेवावें. महत्त्वाचा मुद्दा कीं, विनोदाचे मृदु, मधुर, कटु, तीव्र, तीक्ष्ण असे अनेक भेद आहेत. त्या प्रत्येकाला जन्म देणाऱ्या बुद्धीचे विशेष (१) विनोदाचा हेतु, (२) त्याचें क्षेत्र, (३) त्याचे मार्ग अथवा त्याच साधनें व (४) त्याचा श्रोतृवर्ग; या चार दृष्टींनीं ध्यानांत धरले पाहिजेत. यासंबंधीं अधिक विवेचन न करतां फौलर या कोसकाराने 'Modern English Usage ' या कोश-ग्रंथांत कोष्टकाच्या रूपाने जे थोडक्यांत : पेण मार्मिक विवेचन केलें आहे तें दिलें म्हणजे माझे श्रम वांचून विस्ताराचें भय राहणार नाहीं !