पान:विचार सौंदर्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२

विचार सौंदर्य


 एक कारण कल्पिलें आहे तें वरच्यासारखेंच एका अर्थानें खरेंहि आहे व बोधरहितहि आहे !

 महाकाव्याच्या निर्मितीला परिस्थिति प्रतिकूल आहे या मुद्दयाचा आतां अधिक विस्तार न करतां अलीकडची अभिरुचीच बदलली आहे या मुद्द्याकडे वळूं या. अभिरुचि बदलली ती महाकाव्याच्या अ-निष्पत्तीमुळे बदलली की, अभिरुचि बदलली म्हणून महाकाव्यें निर्माण होत नाहींत, हा येथें प्रश्न उत्पन्न होईल. त्याचप्रमाणें लोकांना अभिरुचि नसली म्हणून विशिष्ट वाङ्मयाची निष्पत्ति तद्भक्ताकडून होण्याची अजिबात थांबते कीं काय, हाहि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण पूर्वीच्या विवेचनाची दिशा ज्याला कळली आहे त्याला या मुद्द्यांचा विस्तार करण्याची जरूर भासणार नाहीं, या विचारानें सदर विस्तार टाळण्याचे ठरविले आहे.

 अलीकडे महाकाव्यें निर्माण न होण्याचे कारण म्हणजे निर्माण करण्यास समर्थ असलेली प्रतिभा अलीकडे दिसत नाहीं असें जर म्हटले तर कांहीं लोक कुचेष्टेनें ' हैं सांगायला तुम्ही नको' असें मनांत म्हणतील, कारण ‘कार्यनिर्मितिसमर्थ कारण नाहीं, म्हणून कार्य नाहीं' असें म्हणण्यासारखेंच. हें होईल. पण याशिवाय दुसरें उत्तर देणें कठीण आहे. कारण प्रतिभा कशी, केव्हां कोणत्या कारणसंघाताच्या योगें, उत्पन्न होते हैं जोपर्यंत आपणास सांगतां येत नाहीं तोपर्यंत या प्रश्नाचा उलगडा होणें शक्य नाहीं. तथापि निराश न होतां या प्रश्नाचा आपण जर विचार करूं लागलों तर पुढील कल्पना सुचतील, व त्या कांहींना ग्राह्य वाटतील.

 महाकाव्य निर्मिति-समर्थ प्रतिभा असल्यावर ती कोणत्याहि परिस्थितींत तसलें काव्य लिहील हे जरी खरें असलें, व तिच्या अभाव कोणत्याहि परि- स्थितींत उत्तम महाकाव्य उत्पन्न होणार नाहीं हें जरी खरे असले ( लांब- लचक व भुरळ घालणारी भाषा टाकून बोलायचें म्हणजे महाकाव्यें कशीं उत्पन्न होतात व कां होत नाहींत हें जरी सांगतां येत नसलें !), तात्पर्य, प्रतिभेची निर्मिति कशी होते हैं गूढ व दुर्ज्ञेय असले, तरी सद्यःकालीन सुसंस्कृत समाजाची मनःस्थिति अलीकडे कशी झाली आहे याचें दिदर्शन करून अलीकडे महाकाव्यें निर्माण करण्यास समर्थ असलेली प्रतिभा कां दिसत नाहीं याचें एक कारण सुज्ञांच्या विचाराकरितां सुचवितां येईल. अलीकडे बाह्य परिस्थितीमध्ये सापेक्षतः स्थिरता व