पान:विचारसौंदर्य.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

(४) काव्यांपासून वगैरे विचारसाहचर्याच्या योगें ( through association of ideas ) अनेक प्रिय किंवा सुंदर वस्तूंची आठवण होते व ही आठवण एक प्रकारचा आनंद देते, हे एक चौथे कारण. कादंबऱ्यांत, निबंधांत वगैरे उपमादि अलंकार असतात ते अर्थविशदीकरणार्थच असतात असे नाही. उपमादिकांच्या द्वारे फुलें, स्त्रिया, वगैरेंची आठवण झाली तर या वस्तु केव्हांहि प्रिय व सुंदर म्हणून (त्यांच्याशी सविकल्प समाधि होते म्हणून नव्हे ) आपणांस त्यांच्या स्मृतीमुळे आनंद होतो. सुंदर वस्तूंचीच स्मृति मला विवक्षित नाही, तर सुंदर वचनें, विचार, भावना, प्रसंग वगैरेंची देखील स्मृति जर काव्यापासून झाली तर ते काव्यहि रमणीय वाटण्यास हे एक कारण होऊ शकते.
  साहचर्य-नियमाने किंवा अन्य कारणाने उत्पन्न होणाऱ्या सुखद स्मृतिलहरींची आपणांस नेहमीच स्पष्ट जाणीव असतेच असे नाही. अबोधपूर्वहि कांहीं स्मृति असतात व त्यांना चालना मिळाल्यामुळे मनुष्य आनंदित किंवाः दुःखित होऊ शकतो हैं येथे सांगितले पाहिजे; पण त्याचा विस्तार करणे अनुचित होईल म्हणून आवरते घेतो.
  (५) कोट्या वगैरे ऐकून आपणास आश्चर्य वाटते व अपेक्षाभंगामुळेहि आपणास आनंद होतो हे केळकरांनी 'सुभाषित व विनोद' या पुस्तकांत दाखविलेच आहे, तेव्हा त्याचे दिग्दर्शनच पुरे.
  (६) हास्यरसाच्या आनंदांत कित्येक वेळां हास्यास्पद ठरविलेल्या व्यक्तीसारखे आपण नाही, आपण त्याहून श्रेष्ठ आहों, या जाणिवेने आनंद होत असतो हैहि केळकरांनी वरील पुस्तकांतच दाखविले आहे.
  (हास्यरसाचा विचार पुढे थोडासा अधिक करावयाचा म्हणून, आहे तो येथेच सोडून देऊ.)
  (७) रम्योदात्त (Sublime:) देखावे किंवा प्रसंग पाहिले असता किंवा त्यांचे वर्णन वाचले असतां जो आनंद होतो त्याचे कारण कॅन्ट (Kant) या तत्त्ववेत्त्याने असे दिले आहे की, हे रम्योदात्त देखावे व प्रसंग कितीहि सामर्थ्यसूचक असले व त्यांपासून आपाततः भीति उत्पन्न होण्यासारखी असली तरी आनंद होतो याचे कारण असे की, सृष्टीच्या प्रचण्ड शक्तीहून आपली नैतिक शक्ति प्रचंडतर, प्रबलतर, आहे अशी जाणीव तेथे उत्पन्न होत असते.व या आत्माभिमानपोषक

३५