पान:विचारसौंदर्य.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

सृष्टीवरहि अधिष्ठित असतात' या केळकरांच्या वाक्यांतील हि या शब्दावर जोर दिला तरी अर्थसमर्थनाचे बाबतींत विशेष भर पडेल असे वाटत नाही म्हणून, व गौण मुद्याचा अधिक विस्तार करणे युक्त नव्हे म्हणून, मुख्य प्रश्नाकडे वळू या.
  माझ्या मते अलंकारांपासून जो आनंद होतो त्यांत अनेक पदार्थाचे एकाच वेळी आकलंन होते हा एक घटक असला तरी हा घटक गौण आहे. भूगर्भशास्त्राचे किंवा रसायनशास्त्राचे किंवा कोठल्याहि शास्त्राचे अध्ययन चालले असतां देखील अनेक पदार्थाचा एकदम्, आनंद घेता येतो, पण तेथे कलात्मक आनंद नसतो, या एका उदाहरणावरून सुंदर अलंकारापासून किंवा कोणत्याहि कलात्मक वर्णना- पासून जो आनंद होतो तो त्या अलंकाराच्या किंवा कलात्मक वर्णनाच्या सौंदर्यापासून होतो, आकलित पदार्थाच्या किंवा व्यक्तींच्या संख्येवर नसतो किंवा एंकसमयाव- च्छिन्न अनुभवावर नसतो हे ध्यानात येईल.
  काव्यानंद काय किंवा कोणताहि कलात्मक अथवा सहजसौंदर्यजन्य आनंद काय, अनेक कारणांनी उत्पन्न होत असतो. विशिष्ट वेळी किंवा विशिष्ट व्यक्तीच्या बाबतीत निरनिराळी कारणे प्रधानत्वेकरून प्रभावशाली होत असतील; पण व्यक्ति- भेद, प्रसंगभेद वगैरे येथे न मानतां त्यांचा येथे थोडक्यात निर्देश करतो.
  (१) एक कारण असे की सहजसुंदर किंवा कलानिर्मित सुंदर वस्तु बहुधा इन्द्रियांना सुखकर असते. फुलें, नद्या, हिरवळ ही नयनानन्ददायक असतात. चित्रे वगैरेहि अशीच असतात. काव्ये कर्णमधुरं असतात. शिवरामपंत परांजप्यांसारख्यांच्या वक्तृत्वांत ( इतर गुणांबरोबर) आवाजाची माधुरी हा एक गुण असतो. गालिचा स्पर्शसुख व नयनसुख देतो. फुलें, अत्तरे वगैरे घाणेंद्रियास सुखवितात. स्त्रियांच्या सौंदर्याने होणाऱ्या आनंदात नयनादि इन्द्रियांच्या संभाव्य सुखांचा अंतर्भाव थोड्याबहुत प्रमाणांत कित्येक वेळा असतोच. सुभाषित व विनोद या ग्रंथांत हास्यरसापासून का आनंद होतो.त्याचे विवेचन करतांना रुधिराभिसरण वाढते, जीवनेशींना चालना मिळते व इन्द्रियांवरील ताण हास्यरसापासून कमी होतो इत्यादि में विवेचन केळकरांनी केले आहे त्याचीहि येथे काही जणांना आठवण होईल.
  (२) सहजसौंदर्य-जन्य आनंदाचे किंवा काव्यादिकला-जन्य आनंदाचे दुसरे एक कारण असे की, तनिर्मिति करणाऱ्याशी आपली एक प्रकारची समरसता उत्पन्न होऊन त्याच्या सामर्थ्याची, बुद्धिवैभवाची, कौशल्याची, सहृदयतेची वगैरे

३३