पान:वामनपंडित.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रीसरस्वतीमंदिर. एवं चतुर्थाश्रम परतंत्र । काम्यत्याग संन्यास स्वतंत्र । इत्यादि अर्थशतांचे सूत्र । पूर्वार्ध या श्लोकाचा. ॥ १११ ॥ -अध्याय १८, श्लो० २. यावरून पंडितांनी चतुर्थाश्रम घेतला नसावासा वाटतो. पंडित है कोठील राहणारे होते हे समजण्यास त्यांच्या ग्रंथांत साधन नाही. पंडित कोरेगांव कुमठे येथील राहणार म्हणून हनुमंतस्वामी म्हणतात व सर्व चरित्रकारांनी त्यांचाच अनुवाद केला आहे. डॉक्टर वुइल्सन आपल्या मराठीवरील निबंधांत कोल्हापूर हे पंडितांचे मूलस्थान असे लिहितात. शिरगांव कोरेगांव मुक्कामी वारणा नदीच्या तीरी पंडितांची समाधि आहे, असे कळल्याचें भारतीय साम्राज्याचे कर्ते व महाराष्ट्र सारस्वताचे कर्ते म्हणतात; व त्यांनी ही माहिती काव्यसंग्रहांतून घेतली आहे. पंडितांची कोरेगांवास जरी समाधि असली, तरी त्यांनी संन्यास घेतलाच होता असें नाही, कारण शवदहन झालेल्या जागी साधुपुरुषांच्या स्मरणार्थ समाधि बांधण्याची किंवा छत्री उभी करण्याची चाल महाराष्ट्रांत असे. १४ असो; या निबंधांत पंडितांचे म्हणून कोणते ग्रंथ निःसंशय ठरवितां येतात व त्यांच्या नांवावर मोडणारे इतर कवींचे कोणते ग्रंथ आहेत याचाच फक्त विचार करावयाचा होता. तो यथामति करून तदनुषंगाने त्यांच्या चरित्रांतील ठळक ठळक मुद्यांचा व त्यांच्या मतांचाही विचार करण्यात आला आहे. पंडितांच्या काव्यांचे काव्यदृष्टीने गुणदोषविवेचन करावयाचे म्हणजे त्यावर एक निराळाच निबंध लिहिणे भाग आहे, त्या विषयाचा प्रस्तुत निबंधांत अंतर्भाव होऊ शकत नाही. वा. अ. भिडे. .