पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


शब्द - जाँ-पॉल सार्त्र. अनुवाद - वा. द. दिवेकर पद्मगंधा प्रकाशन, माडीवाले कॉलनी, पुणे - ४११०३० प्रकाशन -१९९९ पृ. २०० किंमत - १३५/-



शब्द

 फ्रेंच साहित्यिक व तत्त्वज्ञानी म्हणून जाँ-पॉल सार्त्र जगभर प्रसिद्ध आहेत. अस्तित्ववादी चिंतक असलेल्या सार्त्र यांचे जीवन व साहित्य अनेक अंगांनी क्रांतिकारी मानले जाते. ते किती टोकाचे क्रांतिकारी होते याचे एकच उदाहरण मी सांगेन. ते साठी पूर्ण करत असताना साहित्याचा निरोप घेण्याचे ठरवून त्यांनी 'शब्द' नावाचे आत्मचरित्र लिहिले सन १९६३ मध्ये अन् त्यांना सन १९६४ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी तो नाकारला, ते हे सांगून की 'पुरस्कारामुळे माझे साहित्य श्रेष्ठ ठरू शकत नाही. वाचकच माझे खरे निर्णायक होत.' सन १९०१ ला नोबेल पुरस्कार सुरू झाला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, अर्थशास्त्र, शांती आणि साहित्य अशा सहा क्षेत्रांतील जागतिक श्रेष्ठत्वासाठी हा पुरस्कार प्रतिवर्षी दिला जातो. आजवर तो ५७९ जणांना दिला गेला. पैकी साहित्याला १०९ वेळा दिला गेला. नाकारणारे एकमेव साहित्यिक म्हणजे जॉ-पॉल सार्त्र होय.

 बालपणावर आधारित जगात जी श्रेष्ठ आत्मचरित्रे मानली जातात, त्यात सार्त्रच्या 'शब्द'चा अंतर्भाव होतो. बुकर टी. वॉशिंग्टनचे 'अप फ्रॉम स्लेव्हरी', 'द डायरी ऑफ अ‍ॅना फ्रँक', माया एंजेलोचे 'आय नो व्हाय द

वाचावे असे काही/८९