पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


फाँस - संजीव वाणी प्रकाशन, दरियागंज, नई दिल्ली - २ प्रकाशन - २०१५, पृष्ठे - २५५ किंमत - रु. ३९५/-



फाँस

 महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या ही मराठी साहित्यात अपवादाने प्रतिबिंबित झाली. मात्र या समस्येस साहित्याद्वारे राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य मात्र केले संजीव यांनी. संजीव हे हिंदी कथाकार, कादंबरीकार म्हणून प्रख्यात आहेत. ते प्रेमचंदांनी स्थापन केलेल्या 'हंस' मासिकाचे काही काळ संपादकही होते. त्यांनी विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांना केंद्रित करून 'फाँस' नावाची कादंबरी दोनेक वर्षांपूर्वी प्रकाशित केली आहे. ती हिंदीत असली, तरी महाराष्ट्रावर आधारित असल्याने मराठी वाचक तिच्याकडे आकर्षित न झाला तरच आश्चर्य!

 विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातलं बनगाव हे एक खेडं. शिबू, शकून, छोटी, बडी असं चौकोनी दलित शेतकरी कुटुंब. पोटापुरती शेती पण पुरेनाशी झाली. पिकपालट, दुबारपेरणी सारे प्रयोग करूनही कर्जाची तोंडमिळवणी काही होत नसलेलं ते त्रस्त, ओढग्रस्त, कर्जबाजारी कुटुंब. तरी पोरींनी शिकावं म्हणून धडपड. छोटी मुलगी कलावती युवक महोत्सवाच्या निमित्ताने पाच दिवस मेंडालेखाला राहते. तरणीताठी पोर पाच रात्री बाहेर घालवते म्हणून गावात गहजब होतो. त्याचं खरं कारण असतं तिचं अशोक नावाच्या सवर्णाच्या प्रेमात पडलेलं असणं. शिबू या सर्व विरोधात हुंडा न

वाचावे असे काही/८६