पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देऊ शकणारा मुलीचा बाप. आपली अख्खी शेती हंड्यापोटी द्यायला तयार होतो तरी नकार. कारण शेती घेऊन काय आत्महत्या करायची? निराश शिबू शिकून हिंदू धर्माच्या रूढी, परंपरा, अडचणींपुढे हात टेकून बौद्ध धर्म स्वीकारतात. तरी दैन्य सरत नाही म्हणून शिबू कंटाळून आत्महत्या करतो. नंतर निराश शकून शेती विकून आपल्याच शेतीत मजूर म्हणून कापूस वेचू लागते.

 परिसरातले अनेक शेतकरी अनेक कारणांनी आत्महत्या करतात पण मूळ असतं शेती फायद्यात नसणं. मोहन वाघमारे, नाना बापटराव, शंकरराव, सुनील, विजयेंद्र अशा अनेकांच्या कथांनी कादंबरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदनांची महागाथा बनून पुढे येते. रामजी दादा खोब्रागडे. दलित पण प्रगतीशील, प्रयोगशील शेतकरी. कृषी पंडित म्हणून शासन त्यांचा गौरव करते ते त्यांनी शोधून काढलेल्या एचएमटी सोना या बियाणामुळे. ते दलित नसते तर राष्ट्रीय स्तरावर गेले असते. शासन त्यांना जे सुवर्ण पदक प्रदान करतं ते खोब्रागडे प्रतिकूल परिस्थितीत विकायला जातात, तर नकली असल्याचं लक्षात येतं. ही असते शासनाची शेतकऱ्यांविषयीची आस्था व तळमळ. कृषी मंत्र्यांना कृषीपेक्षा क्रिकेटमध्ये अधिक रस. मोहनराव वाघमारे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते. तुरुंगवास नि पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाऊन लुळेपांगळे होतात पण पोटच्या मुलास मात्र नोकरी नाही देऊ शकत. नोकरीसाठी लाच, वशिला इथलं वास्तव. मुलाच्या लेखी बाप कसा? तर 'एक हमारा बाप है, झिंदाबाद, मुर्दाबाद करते खुद मुर्दा बना है।' हे असतं इथल्या शेतकरी संघटनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं जीवन. विदर्भातला शेतकरी रात्रीत श्रीमंत व्हायचं म्हणून बीटी कॉटन पेरतो अन होतो फकीर! शेतकऱ्यांचे गोठे कधी काळी गाय, म्हैस, बैलजोडीने भरलेले असायचे, तिथे आज दिसतो एकमात्र रेडा। बैलगाडीची जागा ट्रॅक्टरने घेतली, कंदिलाची जागा विजेने घेतली तरी शेती तोट्यातच.

 खेड्याचं दुसरं एक वास्तव आहेच. विवाह, जत्रा, जुगार, तमाशाच्या नादी लागलेला निराश, हताश शेतकरी. पण बंडी, खिशात मोबाईल्सचा रिंगटोन 'काँटा लगाऽऽ', 'चोली के पीछे क्या है?' चा नाद लावत डान्स बार, ढाबा आणि बरंच काही. पण हे अपवाद. खरा शेतकरी दुभतं जनावर दारी असून सर्व दूध 'गोकुळ' ला. पण घरचं गोकुळ दुधाविना कुपोषित. सातबारा एकाचा पण कोरा मिळेल तर शपथ! एक कर्ज भागवायला दुसरं कर्ज! का नाही शेतकरी आत्महत्या करणार? शेतमजुराला कोरडवाहू शेती

वाचावे असे काही/८७