पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/69

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


राजबंदिनी : आँग सान स्यू ची हिचं चरित्र प्रभा नवांगुळ राजहंस प्रकाशन, पुणे प्रकाशन - मे, २०११ पृष्ठे - २८८ मूल्य - रु. २५०/-



राजबंदिनी आँग सान स्यू की हिचं चरित्र

 असं म्हटलं जातं की माणसाला ज्या गोष्टी मिळायच्या, त्या सहज

मिळता कामा नये. मग त्याची किंमत नाही राहात. स्वातंत्र्याचेही तसेच आहे. भारताच्या तुलनेने शेजारच्या म्यानमार (ब्रह्मदेश)चा स्वातंत्र्य लढा पाहिला की वरील विधानाची प्रचिती येते. भारत व तत्कालीन ब्रह्मदेश या स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या वसाहती होत्या. त्यामुळे भारतीय ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीच ब्रह्मदेश असे. तिथल्या नि इथल्या स्वातंत्र्य लढ्याचा समान दुवा म्हणजे सुभाषचंद्र बोस. ब्रह्मदेश स्वतंत्र व्हावा म्हणून लढणाऱ्या ऑँग सान सारख्या तरुण विद्यार्थी कार्यकर्त्यांपुढे सुभाषचंद्र बोसांचा आदर्श होता. आँग सानची स्वातंत्र्य लढ्यात राजकीय हत्या झाली. तो ब्रह्मदेशचा 'राष्ट्रपिता' बनला. त्याच्या पश्चात त्याची पत्नी दॉ खिन की त्याची वारस बनली. ब्रह्मदेश सन १९४८ मध्ये स्वतंत्र झाल्यावर दॉ खिन की भारतातली ब्रह्मदेशची राजदूत बनली. जेव्हा ती आपल्या मुला-मुलींसह भारतात आली तेव्हा आँग सान स्यू की पण तिच्याबरोबर होती. नवऱ्याच्या मृत्यूनंतर दॉ खिन की आँग सान स्यूची घडण आपली वारस म्हणून केल्याने ब्रह्मदेशच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या लोकशाही विरुद्ध

वाचावे असे काही/६८