पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 लोकमान्य टिळक प्रकाशक म्हणून कसे होते? महात्मा गांधी साहित्य प्रकाशन संस्था 'नवजीवन' कशी जन्माला आली? स्वेट मॉर्डेन या जगप्रसिद्ध लेखकाने मानधन न घेता आपल्या पुस्तक भाषांतराचे अधिकार का दिले? चित्र, चेहरा ते ब्लॉक आणि आज हाय रिझोल्यूशन सॉफ्ट कॉपीपर्यंतचा प्रवास कसा झाला? लेखक-प्रकाशक हे सारं गप्पांतून सांगणारं पुस्तक वाचणं म्हणजे वाचकाचं प्रगल्भ होणं. अशी पुस्तकं हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात की जी नेहमी उशाखाली असावी अशी वाटतात. पट्टीचा वाचकप्रिय पुस्तके झोपेतही हाती लागेल अशा बेताने ठेवत असतो. अशा ठेवणीतल्या पुस्तकांची रंगतच न्यारी. मराठी अभिमान गीत गाण्यात गैर काहीच नाही. आपले मराठी पुस्तकांचे वाचन अभिमान म्हणून मिरवावे असे आहे का? या प्रश्नांचे काहूर हे पुस्तक जागवते. म्हणून ते जवळ हवे.

◼◼

वाचावे असे काही/६७