पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुक्तिबोध : एक व्यक्तित्व सही की तलाश में कृष्णा सोबती राजकमल प्रकाशन, सुभाषमार्ग, दरियागंज, नई दिल्ली - ११०००२ प्रकाशन - २०१७ पृ. १२४, किंमत - रु. ४९५/-



मुक्तिबोध

 हिंदीतील प्रख्यात कादंबरीकार कृष्णा सोबती यांना यावर्षीचा (२०१७) भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा भारतीय ज्ञानपीठाचा ५३ वा पुरस्कार होय. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या हिंदीतील ११ व्या साहित्यिक. त्यांचं नि मराठीचं एक नातं आहे. हिंदीतील श्रेष्ठ कवी गजानन माधव मुक्तिबोध हे मूळ मराठी भाषी. पण शिकले, वाढले मध्यप्रदेशात. घरी मराठीत बोलत. समाजात हिंदी. लेखनाचा भाषिक क्रम मात्र इंग्रजी, हिंदी नंतर मराठी. मराठी साहित्यावरचं त्यांचं एक टिपण माझ्या संग्रही आहे. मात्र ते आहे इंग्रजीत लिहिलेलं. महाराष्ट्र स्वतंत्र राज्य होण्यापूर्वी मराठी भाषी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पाठ्यपुस्तकं लिहिलीत. ती पुस्तकं ते हिंदीत लिहीत. मग मराठी भाषांतर करून छापत, प्रकाशित करत. अशा या श्रेष्ठ हिंदी कवीचं हे जन्मशताब्दी वर्ष (२०१७) होय. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणाऱ्या कृष्णा सोबती यांनी जन्मशताब्दी निमित्त एक पुस्तक लिहिलं असून नुकतंच त्याचं प्रकाशन झालं. पुस्तकाचं नाव आहे, 'मुक्तिबोध : एक व्यक्तित्त्व सही की तलाश में'. कृष्णा सोबती यांनी मुक्तिबोधांच्या कवितेतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला शोध म्हणून या पुस्तकाचं असाधारण महत्त्व आहे. यापूर्वी कृष्णा सोबती यांनी 'हम

वाचावे असे काही/१४२