पान:वाचन (Vachan).pdf/१४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


परिशिष्ट ४ वाचन, पुस्तके आणि कविता

मला आठवतं तो दिवस ४ एप्रिल, २०१८ चा होता. मी 'वाचन पुस्तकाच्या लिखाणात इतका गढून, रमून गेलो होतो की, झोपेतही लिहीतच रहायचो. ४ एप्रिल, २०१८ ला पहाटे ३.०० वाजता जाग आली नि लिहायला बसलो तर पुस्तक लिहायचं सोडून कविताच लिहीत गेलो. एका बैठकीत, एका प्रवाहात लिहिलेल्या या कविता. कोणताही पूर्वविचार, चिंतन न करता झरझर उतरलेल्या-

कठीण समय येता हात देतात पुस्तके बोट धरूनही बुडणाऱ्यास वाचवतात पुस्तके घर पेटेल तेव्हा पुस्तके स्वत:सही पेटवून घेतात.


माणसासारखे राहायला नसते जमत पुस्तकांना वाचकाच्या चितेबरोबर

पुस्तके राख होणं करतात पसंत

वाचन १४७