पान:वाचन (Vachan).pdf/१४९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


मूकदर्शक होऊन रक्षाविसर्जन त्यांना नसतं जमत, ती असतात इमानी इतबारे होतात स्वाहा स्वेच्छा! वाचकाशिवाय जगायचे कसे? यक्ष प्रश्न असतो त्यांचा...

पुस्तके नसतात धोका देत नि शब्द ही नसतात फिरवत धीर देतात संकट समयी पुस्तके संकटमोचक असतात खरी!


पुस्तके असतात प्रसिद्ध वंचित, उपेक्षित ही, प्रसिद्ध, डांगोरा पिटलेली, वाचनीय असतातच असे काही नाही, माध्यमांच्या युगात या ती गाजवली जातात, दवंडी पिटली जाते, पण एकदा का बहर ओसरला दवंडी नि दिमडीचा मिटली जातात पानं

दुमडून राहतात मनं कायमची...

वाचन १४८