या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
डॉ. द. भि. कुलकर्णी -
- वाचन संस्कृतीपेक्षा वाचक संस्कृती शब्द अधिक चांगला.
चंद्रकांत देवताळे-
- भणंगभटक्या आयुष्यात पुस्तकांची सावलीच जगण्याला बळ देऊ शकेल,
यावर माझा विश्वास आहे. महावीर जोंधळे -
- संगणकावरचे रंग जोपर्यंत तुमच्या लिखाणात येणार नाही तोपर्यंत नव्या
पिढीचा वाचक वाचनाकडे फिरकणार नाही. अरूण जाखडे -
- वाचक अभिरूची घडवणे हे लेखकांप्रमाणे प्रकाशकांचेही कार्य आहे.
भास्कर आर्वीकर -
- वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आपला केंद्रबिंदू 'मुलं' हाच असला
पाहिजे. बाबा भांड -
- चांगलं साहित्य कोणतं तर जे तुम्हाला वाचताना थकवतं, अस्वस्थ करतं.
यादव शंकर बावीकर -
- वाचनापासून मनुष्यास उत्कृष्ट विचार उत्कृष्ट भाषेत व्यक्त करण्याची
कला साध्य होते. दिनकर गांगल -
- संवेदनशीलता, निर्मितीक्षमता, जाणीवजागृती, भावनाविष्कार, विचारप्रक्षोभ
अशा मनाच्या विविध आघाड्यांवर वाचनाचा संस्कार असतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम -
- एक चांगलं पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती असतं.
हेमराज बागूल -
- नव्या मनूचा युवक घडविण्यासाठी नव्या प्रेरणांचे वाचन हवे.वाचन/१३०