पान:वाचन.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७८
वाचन.

वर्णन, रूपकें, हृदयंगम प्रसंग वगैरे विविधविषयांवर अलीकडे मराठीत कविता होऊं लागल्या आहेत. रघुवंश, मेघदूत या सुप्रसिद्ध संस्कृत काव्यांची मराठी भाषान्तरें कै० गणेश- शास्त्री लेले ह्यांनीं केलीं आहेत. बापूसाहेब कुरुंदवाडकर यांनी भट्टवंशकाव्य आर्यावृत्तांत मराठीत केलें. परंतु त्यांत संस्कृत शब्दप्राचुर्य विशेष आहे. कै० कुंटे यांनी 'राजा शिवाजी' नामक वीररसप्रधान काव्य ग्रीक किंवा इंग्रजी धर्तीवर लिहिण्याचा प्रयत्न केला असून त्यांत कित्येक भागांत चांगला काव्यरस उतरला आहे. रा. वासुदेवराव खरे यांचें 'यशवंतराव महाकाव्य ' वाचण्यालायक आहे. कृष्णाकुमारी हिची काव्यात्मक सरस अशी मराठीत एकदोन चरित्रे झाली आहेत. कै० पाळंदे यांची ' रत्नमाला' वा. दा. ओक यांचे 'काव्य माधुर्य', महाजनी यांची 'कुसुमांजलि', पेठकर यांचें 'गंगावर्णन ', कृष्णशास्त्री यांची 'पद्यरत्नावलि', लेले यांची 'पद्यमजरी', मोगरे यांची 'अभिनव कादंबरी' या कविता तरुण वाचकांनी अवश्य वाचण्यासारख्या आहेत. स्कॉट नामक आंग्ल कवच्या 'लेडी ऑफ धि लेक' नामक काव्याच्या प्रथम आणि शेव. टच्या सर्गाच्या आधारें रा. प्रधान यांनी 'दैवसेनी' काव्य लिहिलें आहे. केरळकोकिळ मासिक पुस्तकाचे एडिटर आठल्ये यांच्या कवितेंत बराच प्रसाद आहे. यांचें 'सासरची पाठवणी ' हैं पुस्तक मुलींनीं अवश्य वाचावें. रे. टिळक, रा. आगाशे, माधवानुज, भांडारे, लोंढे या कवींच्या कविता चांगल्या असतात. बाबा गर्दे यांनीं पंचदशी व गीता हे दोन संस्कृत ग्रंथ मराठी वाचकांच्या सोयीकरितां विविध प्रकारच्या सुस्वर पद्यांत लिहून गीतपंचदशी व गीतामृत शतपदी या नांवानी प्रसिद्ध केले आहेत. काव्यदोहन, पद्यरत्नसमुच्चय, अभिनव