पान:वाचन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना.

 हा माझा पहिलाच प्रयत्न असून वाचकांनीं हंसक्षीर न्यायानें यांतील चांगला तेवढाच भाग घ्यावा आणि वाईट तेवढा टाकावा, अशी त्यांना सविनय प्रार्थना आहे.

 ता. ५-११-१९००

ग्रंथकर्ता.


दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना.

 मे. डायरेक्टर साहेव मुंबई इलाखा यांजकडून पहिल्या आवृत्तीचें परीक्षण होऊन ज्या सूचना आल्या, त्याप्रमाणें ही आवृत्ति दुरुस्त केली आहे. प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचें वाचन हा भाग थोडा वाढविला आहे. मराठी पुस्तकें हा भाग मोठा असल्यामुळे आणि अलिकडे मराठी पुस्तकांत वरीच भर पडल्यामुळे तो सुव्यवस्थित आणि थोडक्यांत लिहिला आहे. या विषयास उपयुक्त होईल अ शाच तऱ्हेचा आतां उपसंहार केला आहे. परिशिष्टांत तत्तमोत्तमच पुस्तकें घातली आहेत. एकंदरीत पुस्तकाची मांडणी पूर्वीचीच कायम ठेविली आहे. तरुण विद्यार्थ्यांच्या हातीं हैं पुस्तक पडावें, त्यांच्याठायीं वाचनाभिरुचि उत्पन्न व्हावी, हाच ग्रंथकर्त्याचा प्रधान हेतु असून त्याकरितां पूर्वीपेक्षां हल्ली किंमत फारच कमी केली आहे.

 मुंबई, ता. १-३-०७

ग्रंथकर्ता..


तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना

ठिकठिकाणच्या शाळा खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून पुस्तकासं आश्रय मिळाल्यामुळे दुसरी आवृत्ती संपून तिसऱ्या आवृत्तीचा सुयोग लवकरच आला, ह्याबद्दल मंथकर्ता त्यांचा फार ऋणी आहे. दुसन्या आवृत्तीत जे दोष राहिले होते, ते काढून टाकून ही तिसरी आवृति विशेष फेरफार न करितां तशीच छापिली आहे. तरी पूर्वीप्रमाणे पुस्तकास आश्रय देऊन मुलांमुलींच्या हातीं जेणे करून तें अधिक पडेल अशी व्यवस्था विद्याधिकारी करतील तर विद्यार्थ्यांचेठायीं' 'वाचनाभिरुचि वा बिद्याभिरुचि उत्पन्न केल्यासारखे होईल.

 मुंबई, ता. २०-७-१०

ग्रंथकर्ता