पान:वाचन.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४६
वाचन.

लॉर्ड मेकॉले – हा प्रसिद्ध निबंधकार व इतिहासकार फार जबर वाचणारा असून कादंबऱ्या वाचण्याचा त्याला विशेष नाद असे, त्याची वाचनाची रीत अशी असे कीं, प्रत्येक पान वाचून झाल्यावर तो पुस्तक मिटी आणि काय वाचलें तें सर्व पुनः ध्यानांत आणी. प्रथम प्रथम त्याच्या ध्यानांत कांहींच राहत नसे, परंतु पुढे त्याची स्मरणशक्ति इतकी वाढली कीं, पुस्तक मिटतांच सर्व मजकूर त्याच्या एकदम ध्यानांत येई. इत- केंच नाहीं, तर वाचलेल्या पुस्तकांतील निवडक वाक्यें तो शब्दशः ह्मणून दाखवी. त्याच्या ग्रंथांत शब्दसौष्ठव, अर्थगांभीर्य व हृदयंगम वर्णनशैली हीं जीं पदोपदीं आढळून येतात, त्या सर्वास कारण त्याचें विशेष व मनःपूर्वक वाचन होय. भ्याँकरे यानें त्याच्या- विषयीं लिहिलें आहे कीं, "एक वाक्य लिहिण्यास तो वीस पुस्तकें वाचतो आणि सृष्टिवर्णनाची एक ओळ लिहिण्यास तो शंभर मैल प्रवास करतो." ज्या विषयावर लिहावायाचें त्या विषयावरील सर्व ग्रंथ वाचून स्वतः मनाची खात्री झाल्या- शिवाय तो आपला ग्रंथ सहसा प्रसिद्ध करीत नसे.
 सर विलियम हॉमिल्टन - नामक एक तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्याचें हाणणे असे कीं, वाचतांना महत्वाच्या भागांवर खुणा करून ठेवाव्या. एकाद्या महत्वाच्या ग्रंथाचा अभ्यास करतांना महत्वाच्या शब्दांखाली किंवा वाक्यांखालीं पेन्सिली- च्या रेघा मारण्याचें काम जर चांगलें शहाणपणानें केलें तर त्या ग्रंथाचा थोडक्यांत गोषवारा काढल्यासारखें होतें. निरनिराळ्या रंगांच्या पेन्सिलींनीं याहीपेक्षां चांगलें काम होतें. ऐतिहासिक दृष्टांतात्मक किंवा इतर तऱ्हेचा मजकूर यांतील भेद दाखविण्यास निरनिराळ्या रंगांच्या पेन्सिली