पान:वाचन.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचे वाचन.

४५

 मिल्टन .- - या आँग्ल कवीनें पाठशाळेत सात वर्षे अभ्यास केल्यावर तो हार्टन नामक गांवी जाऊन राहिला. तेथें त्यानें पांच वर्षे वाचनांत घालविली. तो काळजीपूर्वक पुस्तकांची निवड करी व उपयुक्त अशींच पुस्तकें वाची. त्यास जी माहिती लागे किंवा ज्या उद्देशानें तो पुस्तक हातीं घेई, ती माहिती मिळेपर्यंत किंवा तो उद्देश साध्य होईपर्यंत तो सहसा पुस्तक खाली ठेवीत नसे. त्याची एक टिपणवही सांपडली आहे. तींत ग्रीक, लॉटिन, फ्रेंच, इटालियन, इंग्लिश इत्यादि ८० ग्रंथकारांच्या ग्रंथांतील टिपणे आढळून येतात. तसेंच त्याने वाचलेलें आराटस, लायकोफन, युरिपिडीस आणि पिंडार हे ग्रंथ हल्लीं उपलब्ध असून त्या ग्रंथांवर त्याने ठिक- ठिकाणी केलेलीं जीं विपुल टिपणें आहेत, त्यांवरून तो किती लक्षपूर्वक वाचणारा होता, याची पूर्ण साक्ष पटत आहे.
 सर वॉल्टर स्कॉट. - ह्या सुप्रसिद्ध कादंबरीकाराची कादं- बरी लिहिण्याकडे जी प्रथम प्रवृत्ति झाली, तिला कारणीभूत सरव्हांटिस नामक एका स्प्यॉनिश कादंबरीकाराचे ग्रंथ झाले, सरव्हांटिसच्या कादंबऱ्या तो मोठ्या आवडीनें वाची व त्यांची फार प्रशंसा करी. घरीदारी किंवा कोठेही तो असला तरी त्याचे अवलोकन फार लक्षपूर्वक असे, त्याला फिरण्याचा व सृष्टिशोभा पाहण्याचा विशेष नाद असे. इटालिअन आणि स्प्यॉनिश या भाषा त्यास चांगल्या अवगत होत्या. कादंबन्या, योद्धांचे पराक्रम, मध्ययुगांतील दंतकथा आणि देशांतील प्रच- लित गाणी ( पोवाडे ) इत्यादि वाचण्याकडे त्याचें विशेष लक्ष असे. त्याची कल्पनाशक्ति विलक्षण होती आणि तीमुळें त्याला एकांतवास मुळींच दुःखद होत नसे.