पान:वाचन.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचे वाचन.

४३

क्रम चालू असतांनाच ते सुरस व उत्तम ग्रंथ वाचीत व शिक्षणक्रम आटोपल्यावर निदान चारपांच वर्षेपर्यंत तरी वाच- नांत काळ घालवीत असत. कोणत्या विषयांवर प्राधान्यत्वें- करून लिहावयाचें तें ठरवून नंतर त्या विषयावरील उत्तमोत्तम ग्रंथ वाचून व त्याची सांगोपांग माहिती मिळवून प्रथम ते आपली भूमिका उत्तम बनवीत असत आणि नंतर ग्रंथ लिहि- ण्यास लागत असत. पुढे लेखन-व्यवसायांतही त्यांचे वाचन चालू असेच. कित्येकांस तर वाचनाची एवढी गोडी लागली होती की, जिवांत जीव असे तोंपर्यंत त्यांनी आपला वाचनाचा हव्यास कधीही सोडला नाहीं. ऐहिक लाभाची इच्छा धरून ते ग्रंथ वाचीत नसत, तर आपणास ज्ञान मिळावे किंवा सत्य कळावें आणि आपल्या हातून उत्तम लोकसेवा व्हावी, हीच त्यांची मोठी इच्छा असे.
 सुप्रसिद्ध वक्ता एडमंड वर्क हा दररोज अजमासें तीन तास वाचनांत घालवीत असे. त्यानें एके ठिकाणीं हाटलें आहे कीं, Ci पुष्कळ वाचन चांगलें, परंतु त्या वाचनाचें मनांत चांगलें रूपांतर करून योग्य प्रसंगी त्याचा उपयोग करणें हें अधिक चांगलें. " ड्रायडनचे गद्य ग्रंथ त्याला फार आवडत असत. गिबन नामक प्रसिद्ध इतिहासकाराच्या चरित्रावरून समजतें की, तो सोळा वर्षांच्या वयाचा होण्यापूर्वीच त्यानें आरबी, इराणी तार्तर, तुर्क वगैरे लोकांविषयीं इंग्रजी भाषेतील सर्व पुस्तकें वाचून टाकिली होती. इतिहासाची त्याला फार गोडी असे. युनिव्हर्सल हिस्टरी [ जगाचा इतिहास ] झेनोफन, हेरोडोटस, यांच्या ग्रंथां- च्या वाचनापासून त्याच्या मनास आनंद होऊन त्याचें सर्व लक्ष इतिहासाकडे लागले व पुढे तो मोठा इतिहासकार झाला.