पान:वाचन.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४२
वाचन.

करून ते वाचकांची मनें खराब गोष्टींकडे लावितात. असली घाणेर्डी पुस्तकें वाचण्याची गोडी लागली ह्मणजे मग उदात्त व प्रासादिक काव्येसुद्धां त्यांपुढे तुच्छ वाटतात ! त्यामुळे ज्ञानार्जनाची इच्छा व तशीच विचार करण्याची संवय नाहींशी होऊन क्षणिक मनरंजन होण्यांतच मोठी गोडी वाटते. अशा रीतीनें घाणेर्डी, पुस्तके वाचण्याकडे वाचकांची प्रवृत्ति होऊन त्या पुस्तकांचा फार जारीनें खप होतो. ज्या पुस्तकांत अशीं चटकदार व स्वकपोल- कल्पित वर्णनें नसतात, तीं पुस्तकें फारशी कोणी हातीं धरीत नाहीत; त्यामुळे चांगल्या पुस्तकांचा खप होत नाहीं; आणि af छापण्यासही कोणी फारसे धजत नाहीत ! याकरितां वाईट पुस्तकें वाचण्याची प्रवृत्ति लोकांत जेवढी ह्मणून कमी होईल तेवढी बरी.


भाग ६ वा.

प्रसिद्ध ग्रंथकार आणि त्यांचे वाचन.

ज्ञानार्जनाच्या काम 'वाचनासारखे दुसरें सुलभ व उत्तम साधन नाहीं, हें पूर्वी सांगितलेच आहे. वाचन हैं खऱ्या विद्वसेचें एक मुख्य अंग होय. जन्मतः मनुष्य विद्वान् नसून विद्वत्ता ही त्यास स्वकष्टाने मिळवावी लागते. अशी विद्वत्ता. ज्यांनीं संपादन करून आपणांस धन्य ह्मणवून घेतलें, जनसमूहास सन्मार्गास लाविलें, ग्रंथ लिहून पुढील लोकांस ऋणी ठेविलें, अशा थोर पुरुषांच्या चरित्र - मालिकेचें अवलोकन केल्यास असे आढळून येईल कीं, दिवसांतून त्यांचे तीन चार तास : तरी निदान पुस्तके वाचण्यांत जात असत. पाठशाळेतील शिक्षण-