पान:वाचन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाचनाची अभिरुचि

२५

सुप्रसिद्ध आंग्ल इतिहासकार गिबन यानें एके ठिकाणी हाटलें आहे कीं, " मला जरी सर्व हिंदुस्थानची संपत्ति कोणी देऊ केली, तरी मी वाचनाची आवड दुसऱ्या कोणास देणार नाहीं." तसेच सर जॉन हर्शेल याला वाचनाची केवढी गोडी होती, हे त्याच्या एका वाक्यावरून स्पष्ट कळते. तो ह्मणतो, 66 ज्या गोष्टीच्या छंदानें सर्व अवस्थांत माझी समाधानवृत्ति राहील, माझ्या सर्व आयुष्यक्रमांत जिच्यायोगाने मला सुख होईल आणि सर्व तापांपासून माझे संरक्षण होईल अशी एखादी गोष्ट परमेश्वराजवळ मागण्याचा मला प्रसंग आला, तर मी 'वाचनप्रियता' हीच मागेन. मग मला सर्व गोष्टी प्रतिकूल झाल्या आणि सर्व जग जरी मजवर फिरलें, तरी त्याची पर्वा मी करणार नाहीं." मोठमोठे कवि, ग्रंथकार, तत्ववेत्ते, हे जबर वाचणारे होऊन गेले. पुष्कळ वाचून बहुश्रुत झाल्याशिवाय जगांत नांवलौकिक मिळणें दिवसेंदिवस अशक्य झाले आहे.
 बुद्धि ही तिजोरीप्रमाणें आहे. तिजोरी असून तीत ठेवण्या- करितां हिरे, माणकें, मोत्यें इत्यादि मौल्यवान् वस्तु पाहिजेत. नुसती तिजोरी असून काय उपयोग ? 'ज्ञानावीण जी जी कळा । ती ती जाणावी अवकळा' असें एका महाराष्ट्र कवीनें हाटलें आहे. ह्या बुद्धीरूपी तिजोरीत ज्ञानसंचय अवश्य पाहिजे आहे. बुद्धि ही पडित जमिनीप्रमाणें आहे. जमीन कितीही चांगली असली, तरी तींतील कांटेरी झाडे काढून टाकून तिची मशागत करून तींत चांगल्या झाडांची लागवड केली पाहिजे; हाणजे मग तेथे सुंदर उपवन बनते. जशी जमि- नीची, तशीच बुद्धीचीही मशागत केली पाहिजे. मनुष्याची किंमत ही त्याच्या ज्ञानावर असते. जेवढे ज्ञान अधिक, तेवढी
 (३) ९७२-२५००-११-७१