वेळी त्यांचे थकलेले कर्ज वसंतरावांनी स्वतःच गुपचूप कसे फेडले त्याचीही एक आठवण आहे. पृष्ठ २२१-२२वर कर्णिक लिहितात, “आमचे तेव्हाचे फॅमिली डॉक्टर कापडी म्हणाले, 'सरकारकडून आम्ही एक जमीन सहकारी गृहनिर्माणासाठी मिळवली आहे. या सोसायटीत एक प्लॉट मी तुला देतो, तो तू घे. किंमत मामुली ठेवली आहे. ५००० स्क्वेअर फुटाच्या प्लॉटला तीन आणे स्क्वेअर फुटाप्रमाणे ९६० रुपये तुला भरायला लागतील. तेवढे आणून भर.' 'माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत' असे मी म्हणालो, तेव्हा ते म्हणाले, 'बेग, बॉरो ऑर स्टील; पण हा प्लॉट सोडू नकोस. सोडलास तर तुझ्यासारखा वेडा तूच.' मी आमच्या घाटगेसाहेबांकडे गेलो. ते सांगली बँकेत डायरेक्टर होते. त्यांनी सांगली बँकेतून मला १००० रुपये कर्ज मंजूर करून द्यावं, अशी विनंती केली. त्यांनी कर्ज मंजूर केलं. मी पैसे भरले आणि प्लॉट नंबर ४४चा मालक झालो. पुढंमागं कधीतरी स्वतःचं घर होईल या कल्पनेनं सुखावलो. दोन वर्षांत कर्ज काही फेडू शकलो नाही. घाटगेसाहेबांची डायरेक्टरपदाची मुदत संपली आणि 'आता मी कर्जफेडीसाठी तुला मुदत वाढवून देऊ शकत नाही' असं ते म्हणाले. मी विचारलं, 'मग मी आता काय करू ?" त्यांनी उत्तर दिलं नाही. पण माझं बँकेचं कर्ज त्यांनी स्वतःच फेडलं. " घाटगे-पाटील इंडस्ट्रीजच्या उभारणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते सध्या सोलापुरात स्थायिक झालेले मदन पालवणकर आपले अनुभव सांगताना म्हणतात, “१ जानेवारी १९६१ रोजी मी घाटगे-पाटील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये लागलो. त्या वेळी घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट व्यवसायात होते आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात यायचं त्यांनी ठरवलं. किर्लोस्करांच्या सल्ल्याने त्यांनी ही नवी कंपनी सुरू केली होती. कंपनीचा लोगो होता, VAJRAGUNAK -VA वसंतरावांसाठी, JR जयकुमारांसाठी, GUN गुणे यांच्यासाठी आणि AK हे ए. के. टेंभे त्यांच्यासाठी. फौंड्री सुरू करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. त्या वेळी तिची क्षमता महिन्याला १५० टन कास्टिंग तयार करायची असणार होती. त्या वेळी तिथे वीज नव्हती, पाणी नव्हतं, फक्त ओसाड जमीन होती. ह्या सर्व अडचणींवर आम्ही मात केली. बारा कामगारांना आम्ही पुढले तीन उद्योगभरारी । १७ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/९९
Appearance