“माझाच दुसरा एक अनुभव सांगतो. माझ्या मुलीला एक स्थळ सांगून आलं. मुलगा अमेरिकेत होता; पण 'त्यामुळे मुलीलाही व्हिसा मिळेल याची शाश्वती नाही' असं भावी व्याह्यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. आता काय करायचं, होकार द्यायचा की नाही, असा माझ्यापुढे प्रश्न पडला. नेहमीप्रमाणे मी वसंतराव व जयकुमार यांचा सल्ला घेतला व त्या दोघांच्या संमतीनेच मुलीचं लग्न नक्की केलं. त्या वेळी संभाव्य अडचणीवर मात कशी करायची याचं नियोजन करताना वसंतराव म्हणाले होते, 'तिला अमेरिकन व्हिसा नाही मिळाला तरी काळजी करायची नाही. आपण तिला घाटगे-पाटील कंपनीची कर्मचारी म्हणून पाठवू व त्यासाठी लागणारा बिझनेस व्हिसा तिला नक्की मिळेल. दर तीन महिन्यांनी आपण तो व्हिसा वाढवत राहू.' पुढे तिला व्हिसा मिळाला व लग्नही उत्तम पार पडलं. माझ्या दुसऱ्या डॉक्टर मुलीने एका ख्रिस्ती डॉक्टर तरुणाशी लग्न ठरवलं. त्या वेळीही मी वसंतरावांचा सल्ला घेतला होता. 'काहीच हरकत नाही, फक्त एक पथ्य पाळायचं. आपली मुलगी काही ख्रिस्ती होणार नाही.' तेव्हाही आम्ही वसंतरावांचा सल्ला प्रमाण मानला. वसंतराव केवळ आमचे बॉस नव्हते, तर कुटुंबप्रमुखच होते. घरातली प्रत्येक महत्त्वाची गोष्ट त्यांना विचारूनच मी करत असे. " राम कर्णिक २२ डिसेंबर १९४८ रोजी घाटगे-पाटील कंपनीत दाखल झाले. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एक सामान्य कामगार म्हणून. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर पार्ट्स मॅनेजर, सेल्स मॅनेजर असे चढत चढत पुढे जनरल मॅनेजर झाले. ते म्हणतात, “घाटगे-पाटील कंपनीची प्रतिष्ठा वाढली, यामागे वसंतराव घाटगे यांची दूरदृष्टी, मॅन्युफॅक्चरर्सवर छाप पडणारे व्यक्तिमत्त्व, निगोशिएशन्समधील हुशारी, चाणाक्षपणा, शिक्षणाचा प्रभाव, विद्वत्ता, संभाषणपटूत्व याच गोष्टी प्रमुख होत्या. कुठलीही व्यावसायिक प्रपोजल्स घेऊन वसंतराव जगात कोठेही गेले आणि यशस्वी होऊन परत आले नाहीत, असे कधीच झाले नाही. वसंतराव घाटगे यांच्यासारखा मार्केटिंग मॅन क्वचितच पाहायला मिळतो, असे त्या विषयाचे तज्ज्ञ म्हणत. " कर्णिक यांनी पूर्वी उल्लेख केलेल्या आपल्या आत्मचरित्रात घाटगे- पाटलांबरोबर त्यांनी केलेल्या प्रदीर्घ नोकरीतील अनेक हृद्य आठवणी सांगितल्या आहेत. कोल्हापूरच्या कोरगावकर कॉलनीत प्लॉट घ्यायच्या वसंतवैभव । १६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/९८
Appearance