शकतो तो कास्टिंगमुळे. कारण आधी धातू वितळवावा लागतो, त्याला योग्य तो आकार द्यावा लागतो आणि मगच त्या लोखंडाचा उपयुक्त वस्तू म्हणून उपयोग करता येतो. ही प्रक्रिया म्हणजेच कास्टिंग. कुठल्याही इंजिनिअरिंग व्यवसायात तयार होणाऱ्या उत्पादनाची ही पहिली पायरी मानता येईल. स्वयंपाकघरातील तव्यापासून ते रस्त्यावरील गटारांच्या झाकणापर्यंत, घराच्या कठड्यापासून मोठमोठी यंत्रे ज्याच्यावर उभी असतात त्या पायापर्यंत प्रत्येक ठिकाणी कास्टिंग लागते. सिलिंडर ब्लॉक्स, गिअर बॉक्सेस वगैरे सारे मशीनचे भाग कास्टिंगचेच बनलेले असतात. एखाद्या मालाचे औद्योगिक उत्पादन करण्यासाठी सुरुवातीला एक नमुना (म्हणजे पॅटर्न) बनवला जातो. त्या नमुन्याची प्रतिकृती असलेला साचा (म्हणजे मोल्ड) बनवणे ही दुसरी पायरी. त्या मोल्डला आतला भागही असतो, जो कधी कधी पोकळही असतो व ज्याला कोर म्हणतात. ह्यासाठी सँड मिक्सर लागतात व विशिष्ट तऱ्हेची वाळूही लागते. त्या नमुन्यानुसार मग कास्टिंगमध्ये इतर पिसेस तयार केले जातात. सुरुवातीला लोखंड वितळवण्यासाठी क्युपोला (Cupola) नावाच्या भट्ट्या वापरल्या जात. त्यात दगडी कोळसा जाळून भट्टीतले तापमान १५०० डिग्री सेंटीग्रेडपर्यंत न्यावे लागते. पुढे इंडक्शन फर्नेसेस म्हणजे विजेवर चालणाऱ्या फर्नेसेस आल्या. ह्या अर्थातच खूप अधिक कार्यक्षम होत्या; पण मध्येच वीज गेली तर सगळे वितळलेले लोखंड, त्याला मोल्डनुसार विशिष्ट आकार लाभायच्या आधीच, दगडासारखे कडक होऊन जायचे व मग अक्षरशः घणाचे घाव घालून त्याचे तुकडे तुकडे करावे लागत. तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्रात हा प्रकार अनेकदा व्हायचा. आता आधुनिक फर्नेसेसमध्ये वीज प्रवाह अखंडित चालू राहील ह्याची दक्षता घेतलेली असते. सुरुवातीला फौंड्रीची क्षमता फक्त महिना १५० टन इतकी होती. पुढे १९६९ साली ही फौंड्री यंत्रचलित करण्यात आली. त्या वेळी तिची क्षमता महिन्याला १००० टन ग्रे कास्टिंग एवढी झाली होती. पुढे याच फौंड्रीचा अधिकाधिक विस्तार होत गेला. सुरुवातीला मुख्यतः वेगवेगळ्या किर्लोस्कर कंपन्यांची कामे चालत; पण पुढे त्याच ठिकाणी इंग्लंडच्या पारसन्स इंजिनिअरिंग कंपनीच्या तांत्रिक सहभागातून मरीन इंजिन्सना लागणारे गिअर बॉक्स, ट्वीन डिस्क इनकॉर्पोरेटेड या अमेरिकन कंपनीच्या तांत्रिक सहभागातून इंडस्ट्रियल क्लचेस आणि पॉवर टेक उद्योगभरारी | ८३ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/८५
Appearance