Jump to content

पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कंपनीने स्वीकारलेल्या आणखी एका थोरणामुळे कंपनीची आर्थिक भरभराट झपाट्याने होत गेली. मालवाहतुकीच्या व्यवसायात जागोजागी माल साठवण्यासाठी गोडाउन्स लागतात, वाहने उभी करण्यासाठी मोकळी जागा लागते. अशा जागा भाड्यानेही घेता येतात; पण घाटगे- पाटलांनी अशी गोडाउन्स भाड्याने घेण्याऐवजी शक्य तिथे स्वतःच विकत घ्यायचे थोरण ठेवले. ही सर्व गोडाउन्स मोक्याच्या जागी आणि प्रशस्त होती. पुण्यात शनिवारवाड्याच्यामागे आणि मुंबईत रे रोडला अशी मोठी गोडाउन्स घेतली गेली. कोल्हापूर, हुबळी, बेळगाव, सांगली, बंगलोर या शहरांतही ती होतीच. गोडाउन्सप्रमाणेच आपल्या वाहनविक्रीच्या शोरूम्ससाठीदेखील कंपनीने मोठमोठ्या जागा खरेदी केल्या. पुण्यात शिवाजीनगरला आणि भोसरीला असेच मोठे भूखंड खरेदी केले गेले. त्या काळी जागांच्या किमती आजच्याप्रमाणे आकाशाला भिडलेल्या नव्हत्या. मालवाहतुकीसाठी व विक्रीसाठी ह्या गोडाउन्सचा उपयोग होताच; पण महत्त्वाचे म्हणजे त्यातून कंपनीची एकूण मालमत्ताही खूप वाढली. त्याशिवाय भावी विस्तारासाठी म्हणून इतरही अनेक जागा कंपनीने खरेदी केल्या जमिनीच्या किमती अतिशय झपाट्याने वाढत जातील ह्याचे भान घाटगे-पाटलांना होते. प्रत्यक्षात तसेच घडले. काळाच्या ओघात ही दूरदृष्टी किती फायदा मिळवून देणारी ठरली असणार, ह्याचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. आज घाटगे-पाटील ट्रान्सपोर्टचे ट्रक्स भारताच्या १३ राज्यांमध्ये अहोरात्र थावत असतात. दक्षिण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात तर कुठल्याही महामार्गावर उभे राहिले, तर घाटगे-पाटील कंपनीचे ट्रक्स केव्हाही दृष्टीस पडतात. पिवळे-लाल (मरून) बोर्ड अभिमानाने शिरोभागी मिरवणारे. या रंगांमुळे 'हळदकुंकू' अशीही या ट्रक्सची ओळख आहे! पुढे घाटगे-पाटलांनी प्रवासी बस वाहतुकीचा व्यवसाय सुरू केला. १९६८ मध्ये मंगलोर-मुंबई रस्त्यावर घाटगे-पाटलांच्या सहा लक्झरी बसेस दैनंदिन स्वरूपात सुरू झाल्या. कंपनीने ही सेवा अगदी दर्जेदार आणि वक्तशीर राखली होती. नव्या कोऱ्या बसेस स्वच्छ धुतलेल्या. ऐसपैस व मागे-पुढे होणाऱ्या सीट्स. पडदे, रेडिओ वगैरे अंतर्गत सजावट. प्रशिक्षित कर्मचारी. ह्या बसेस अगदी स्वच्छ ठेवल्या जात. ठरलेल्या ठिकाणी त्या आतून-बाहेरून धुतल्या जात. त्या वेळी सगळे प्रवासी वसंतवैभव | ७६।