संस्थांनी आयोजित केलेले व्यवस्थापनशास्त्राचे वेगवेगळे कोर्सेस केले. खूपदा जयकुमारही त्यांच्याबरोबर असत. व्यवसायात उच्चपदी पोचल्यावरही असे शिक्षण घेण्यात, पुन्हा एकदा विद्यार्थी बनण्यात, त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. आपल्या अन्य सहकाऱ्यांनीही असेच कोर्सेस करावेत ह्यासाठीही त्यांनी सतत प्रयत्न केले; त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले, त्यांना खास रजा मंजूर केली. अनेकांना त्यांनी शिक्षणासाठी परदेशीही पाठवले. याबाबतचे एक उदाहरण इथे देण्यासारखे आहे. हैद्राबाद येथील अॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया ही एक नामांकित शिक्षणसंस्था आहे. आयएएस अधिकारी व इतर तत्सम उच्च अधिकाऱ्यांना तिथे अधिक प्रशिक्षण दिले जाते. चांगले तीन-चार महिन्यांचे हे निवासी व पूर्णवेळ कोर्सेस असत आणि एका वेळी फक्त चाळीस-पन्नास विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाई. अशा कोर्सेसनाही वसंतराव आपल्या निवडक अधिकाऱ्यांना पाठवत असत. जनरल मोटर्ससारख्या अमेरिकन कंपन्या कार डीलर्ससाठी म्हणून परदेशातही असे कोर्सेस आयोजित करत असत व त्यांतही वसंतराव सहभागी होत; इतर सहकाऱ्यांनाही सहभागी व्हायची संधी देत. उदाहरणार्थ, व्हॉक्झॉल मोटर्स ही जनरल मोटर्सची इंग्लंडमधील उपकंपनी. त्यांच्या ल्यूटन येथील कारखान्यात त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड ह्या विख्यात विद्यापीठाचे काही प्राध्यापक आणून एक तीन महिन्यांचा पूर्णवेळ बिझिनेस मॅनेजमेंट कोर्स १९६८ साली आयोजित केला होता. फक्त निवडक चाळीस जणांना तिथे प्रवेश होता. त्यासाठी घाटगे-पाटलांनी राम कर्णिक यांना पाठवले होते. कर्णिकांना निरोप देताना घाटगे-पाटील म्हणाले होते, " हे शिक्षण म्हणजे काही कसली स्पर्धा नाही. तिथली सगळी बिझिनेस टेक्निक्स, पद्धती आपल्या देशात लागू करता येणारही नाहीत. म्हणून त्यात फार लक्ष घातलं पाहिजे, असं नाही. तुम्हांला तिथे पाठवण्यामागे आमचा उद्देश असा आहे, की तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटावं, बिझिनेसबाबत व्यक्तीव्यक्तींचे अॅप्रोचेस कसे आहेत, ते किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात हे पाहावं, एकूणच तुमचा दृष्टिकोन व्यापक व्हावा आणि जगात वावरत असताना आपण कुठंही कमी पडणार नाही एवढा तुमचा आत्मविश्वास वाढावा. “सर्वसाधारणपणे आपल्या लोकांना वाटतं, की वेस्टर्न कंट्रीजमध्ये लाईफ इज इझी. पण प्रत्यक्षात ते हाई आहे. योग्य आणि भरपूर काम न वसंतवैभव | २३८ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२७२
Appearance