तासात आणून दिलं! त्यांनी ते कुठून पैदा केलं कोण जाणे! माझ्यावर त्यांनी खूपच प्रेम केलं. माझ्यावर ते रागवू शकतच नसत. दुसरं कोणी मला काही बोललं, तर मी लगेच त्यांच्याकडे जायचो. ते म्हणजे जणू माझं ब्रह्मास्त्र होतं! माझं सगळ्यांपासून रक्षण करणारं! रोज सकाळी ब्रेकफास्ट घेताना आम्ही टेबलाच्या दोन टोकांना बसायचो, याचीही मला आठवण आहे. " आपल्या कुटुंबाविषयी आजोबांना अतिशय प्रेम होतं. फक्त त्यांच्याच मुलांविषयी नव्हेतर पुतण्यांविषयीदेखील. १९८६ साली आजोबा चारले, तेव्हा आम्ही वडलांनी बांधलेल्या स्वतंत्र नव्या घरात शिफ्ट झालो होतो; पण त्यांच्याकडे मी नेहमी जायचो. डायबिटीस असल्याने ते स्वतः रोज इन्शुलिन घ्यायचे. ते बघायला मला आवडायचं. तेही खास मला भेटण्यासाठी म्हणून आमच्याकडे रोज सकाळी यायचे, मी घरी असेन तरच आत यायचे, नाहीतर तसेच पुढे ऑफिसात निघून जायचे. “त्यांची जिद्द अगदी सॉलिड होती. काहीही करून येणाऱ्या अडचणींवर मात करायची आणि मार्ग काढायचा, असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी येत गेल्या; पण प्रत्येक अडचणीतून ते काही ना काही शिकत गेले. Whatever he learnt in life was through the hard knocks of life. “ भविष्यातही त्यांचा वारसा आम्हांलाच पुढे चालवायचा आहे. आमच्या कंपनीचं विभाजन झालं, तेव्हा सर्व ऑटो एजन्सी आमच्या हातातून गेल्या होत्या. आज ज्या एजन्सी आमच्याकडे आहेत, त्या सर्व आम्ही नंतरच्या काळात मिळवलेल्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत घाटगे समूह म्हणून काम करताना आम्ही ह्या स्तरापर्यंत येऊन पोचलो आहोत; परंतु सर्व्हिस क्षेत्र आणि विक्री क्षेत्र हा व्यवसायाचा एक भाग झाला, उत्पादन क्षेत्र हेही तितकंच महत्त्वाचं आहे. इंडस्ट्री हा विभागही आमच्याकडे त्या वेळी आला नव्हता. माझ्या आजोबांना प्रत्यक्ष उत्पादन क्षेत्रात खूप इंटरेस्ट होता. मोपेडमध्ये आम्ही लुनाच्या पूर्वी आलो होतो. मोठ्या कष्टांनी त्यांनी वेगवेगळ्या मूळ उपकरणांच्या उत्पादकांशी (Original Equipment Manufacturers) करार करून, ते बनवत असलेले सुटे भाग आमच्याकडे बनवायला सुरुवात केली होती. भविष्यात आता घाटगे समूहाला या उत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करायचं आहे." वसंतवैभव | २३६ ।
पान:वसंतवैभव - वसंतराव घाटगे जीवन आणि वारसा.pdf/२७०
Appearance